Kokan
Kokan esakal
कोकण

Kokan : वरंधा घाटातील वाघजाई मंदीरापर्यत रस्ता खुला

विजय जाधव

भोर ः महाड-भोर-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावरील वरंधा घाट ते महाड दरम्यानच्या रस्त्याच्या कामामुळे वरंधा घाटाच्या महाडच्या बाजूची सर्व वाहतूक ३० मे पर्यंत बंद राहणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि पोलिस विभागाकडून अहवाल मागविल्यानंतर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सोमवारी (ता.८) वरंधा घाटातील महाडच्या हद्दीतील वाहतूक बंद करण्याचा आदेश दिला.

यामुळे भोरमार्गे महाड व कोकणात जाता येणार नाही. मात्र वरंधा घाटातील भोरच्या हद्दीतील वाघजाई मंदीरापर्यंत म्हणजे भोरपासून सुमारे ५० किलोमीटरच्या टापूत वाहतूक सुरु राहणार आहे. त्यामुळे भोर परिसरात फिरायला येणा-या पर्यटकांना वरंधा घाट बंद असल्याचा काहीही फरक प़डणार नाही. सुट्टीच्या दिवशी पुण्या-मुंबईतील अनेक पर्यटक हे एक किंवा दोन दिवसाच्या आऊटींगसाठी भोर परिसरात येतात. तालुक्यातील पर्यटनस्थळे पाहून हॉटेलमध्ये किवा कृषी पर्यटन केंद्रात वन नाईट स्टे करून पुन्हा परत जातात.

पर्यटकांना भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र बनेश्वर, बालाजी मंदीर, नीरा नदीचा नेकलेस पॉईंट, भाटघर धरण, भोरचा राजवाडा, शनिघाट, स्वामीमसर्थ मंदीर, मांढरदेवी, नीरा-देवघर धरण, आंबवडेचे नागनाथाचे मंदीर व झुलता पूल, वरंधा घाटातील वाघजाई मंदीर, शिरगाव व उंबर्डे येथील पाण्याचे धबधबे, सह्याद्रीच्या डोंगररांगांचे व द-याखो-यांचे विहंगम दृश्य, रायरेश्वर व रोहिडेश्वर किल्ले या पर्यटनस्थळांवर आजही जाता येणार आहे. पर्यटनाबरोबर काळी मैना (करवंदे), जांभूळ, आळू, आंबे व हिरडा यासारखा रानमेवा ही सुरु होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना नेहमीप्रमाणे पर्यटनाचा आनंद घेवून पुन्हा भोरमार्गेच परत घराकडे जावे लागणार आहे. वरंधा घाटातील वाघजाई मंदीराच्या पुढे भोर तालुक्याच्या हद्दीतील शेवटचे ठिकाण असलेल्या सुळका पॉईंटपर्यत वाहने जाऊ शकतात. तेथून पुन्हा परत यावे लागणार आहे.

वरंधा घाटातील भोरच्या हद्दीतील रस्ता हा वाहनांसाठी खुला आहे. मात्र भोर हद्दीच्या शेवटच्या ठिकाणाहून वाहने परत वळविण्यासाठी योग्य प्रकारची जागा नाही. त्यामुळे पर्यटकांना बसपेक्षा छोटी वाहने घेवून यावे लागेल. याबाबत भोरचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वरंधा घाटातील भोर हद्दीतील वाहतूक बंद करण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत. मात्र भोर वरंधा घाट मार्गे महाडला जाता येणार नाही. वरंधा घाटातील भोरच्या हद्दीपर्यत वाहनांना जाण्यास परवानगी असल्याचे त्यांनी नमूद केले.

वाहने जपून चालवावीत

भोर तालुक्यात येणा-या पर्यटकांनी वरंधा घाटातून वाहने जपून चालवावीत. घाटातील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम झाले चांगले झल्यामुळे वाहनांचे वेग सुमार आहेत. परंतु घाटात वेडीवाकडी वळणे असून तेथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहने दरीत कोसळून अनेक अपघात झालेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी वरंधा घाटातून वाहने चालविताना योग्य ती खबरदारी घ्यावी. - अण्णासाहेब पवार, पोलिस निरीक्षक, भोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT