There was a heat wave in Konkan matrathi news  
कोकण

सावधान ! कोकणात आली उष्म्याची लाट....

सकाळ वृत्तसेवा

ओरोस  (सिंधुदुर्ग) :  सिंधुदुर्गात उष्म्याची तीव्रता अचानक वाढली. जिल्ह्यात उष्म्याची लाट येण्याची भीती हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे खबरदारीचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून आज करण्यात आले.गेले काही दिवस वातावरणात वारंवार बदल होत आहे. आज मात्र या बदलत्या वातावरणाने दिवसभर उष्णतेत कमालीची वाढ झाली. परिणामी जिल्ह्यातील नागरिकांच्या अंगाची दिवसभर लाही-लाही झाली. प्रादेशिक हवामान विभागाने सुद्धा 
आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे.

मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ झाली असून उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. तरी त्या अनुषंगाने आवश्‍यक ती खबरदारी घेण्यात यावी, असा इशारा दिला. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांनी जिल्ह्यातील नागरिकांना जागृत करीत काळजी घेण्याचे आवाहन केले.
गेले काही दिवस सिंधुदुर्गचे वातावरण कायम बदलते राहिले आहे. दिवसा उष्णता तर रात्री थंडी अशी स्थिती कायम होती.

वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण

महाशिवरात्रीनंतर वेगवान वारे वाहत होते. आज मात्र दुपारपर्यंत वाऱ्याची साधी झुळुक सुद्धा आली नाही. त्यामुळे अचानक वाढलेल्या उष्णतेची झळ चटके नागरिकांना बसले. नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. दुपारनंतर मात्र काही प्रमाणात वारे वाहू लागल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. काही वेळा तर वाऱ्याचे गोल भोवरे येत होते. एकंदरित अचानक वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले.

हेही वाचा- राज्य सरकारचे आदेश ; गड-किल्ल्यांवर मद्यपान केल्यास भोगावी लागणार अशी शिक्षा अन् एवढा दंड,  .... ​

आंबा, काजूची गळ होण्याची भीती 
सिंधुदुर्गात आंबा आणि काजू पिकाच्या दृष्टीने हा संवेदनशील हंगाम आहे. सध्या फलधारणा सुरू झाली आहे. काजू तसेच आंब्यावर फळे दिसू लागली आहेत. उष्म्याची तीव्रता अशीच वाढल्यास फळगळ होण्याची भीती आहे.

आर्द्रता कमी झाल्यामुळे उष्णतेची झळ

जिल्ह्यात उष्णतेच्या झळा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्याचे कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. सायंकाळच्या वेळेस हवेतील असलेली आर्द्रता कमी झाल्यामुळे उष्णतेची झळ आणखीनच वाढली आहे.
- डॉ. यशवंत मुठाळ, शास्त्रज्ञ, ग्रामीण कृषी मौसम सेवा उद्यानविद्या मुळदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

SCROLL FOR NEXT