ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाने 2020-21 साठी जिल्ह्यातील जोखीमग्रस्त गावे निश्चित केली आहेत. मागील तीन वर्ष ज्या गावात लेप्टोस्पायरोसीस, जलजन्य साथीचे आजार उद्धभवले, अशी 222 गावांची यादी प्रशासनाने जाहीर केली आहेत. या सर्व गावांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. दरवर्षी जिल्हा आरोग्य विभाग पावसाळ्यात जोखीमग्रस्त गावे निश्चित करत असतो. त्या गावात मागील तीन वर्षात उद्भवलेल्या जलजन्य साथीच्या आजारावर तो गाव जोखीमग्रस्त म्हणून जाहीर करतात.
या जोखीमग्रस्त गावांमध्ये विशेष काळजी घेण्यात येणार आहे. या गावात लेप्टोस्पायरोसिस किंवा जलजन्य साथीचे रुग्ण सापडू नयेत, यासाठी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे विशेष लक्ष असणार आहे.
तालुकावार जोखीमग्रस्त गावे
वैभववाडी तालुका- मांगवली, तिरवडे, कोकिसरे, देवगड तालुक्यांतील गोवळ, गडीताम्हाणे, मुटाट, नाडन, कोटकामते, कुणकेश्वर, देवगड, जामसंडे, चाफेड.
कणकवली- शिवडाव, बोर्डवे, शिरवल, ओसरगाव, हळवल, वागदे, नाटळ, नरडवे, कोळोशी, नांदगाव, तरंदळे, साकेडी, कलमठ, वरवडे, जाणवली, जांभूळगाव, साटमवाडी, कासारडे, मालवण - चिंदर, आचरा, त्रिंबक, पांडलोस, डांगमोडे, मर्डे, कोथेवाडा, धुरीवाडा, चाफेखोल, नांदरुख, मालवण शहर, किर्लोस, हिवाळे, ओवलीये, शिरवंडे, विरण, हेदूळ, चुनवरे, खोटले, सुकळवाड, कुसरवे, तळगाव, कालेली, हुमरस, आकेरी, ढोलकरगाव, चाफेखोल, नारुर, कुपवडे, आंबेरी, निवजे, कांदुळी.
कुडाळ - झाराप, आंबडपाल, किनळोस, बिंबवणे, मिटक्याचीवाडी, नारुर, मांडकुली, घावनाळे, नेरुर, मुणगी, कुडगाव, चेंदवण, केळूस, वालावल, गावधड, अणाव, ओरोस, आंब्रड, कसाल, पोखरण, पडवे, हुमरमळा, रानबांबूळी, गावराई, कुंदे, कुडाळ, वेताळबांबर्डे, पावशी, बोरभाटवाडी, दिगस, सरंबळ, पिंगुळी, टेम्बगाव, ओरोस खुर्द, जांभवडे, भूतवडे, वर्दे, पांग्रड, सोनवडे,
वेंगुर्ले - आरवली, रेडी, परुळे, कालवी, निवती, होडवडा, तुळस, पाल, आरवली, उभादांडा, सुखटनगाव, वेंगुर्ले शहर, आवेरा, वजराठ, भंडारगाव, खानोली, राजापूरकरवाडी, मठ, वेतोरे, दाभोली.
सावंतवाडी - इन्सुली, निगुडे, मडुरे, शेर्ले, बांदा, रोणापाल, नेतर्डे, सातोसे, गाळेल, कास, भिकेकोनाळ, पाडलोस, डिंगणे, आरोसबाग, आंबोली, चौकुळ, माडखोल, भोम, आरोस, तिरोडा, किनळे, आजगाव, आरोंदा, मळेवाड, सोनुर्ली, धाकोरे, कवठणी, वेर्ले, कुणकेरी, कोलगाव, सांगेली, कारिवडे, कलंबिस्त, शिरशिंगे, सावरवाड, मळगाव, ओटवणे, नेमळे, चराटे, निरवडे, तळवडे (कुंभारगाव).
दोडामार्ग - सासोली, कसई, पाटये पुनर्वसन, पडवे माजगाव, गिरोडे गावठाण, आंबेरी, मणेरी, आडाळी, कळणे, उगाडे, डेगवे (मोयझर), पडवे, मोरगाव, तिराली, निळेली, असनिये, तळकट, कुंब्रल, कुडासे, झोळंबे, भेकुर्ली, कोलझर, शिरवल, तांबुळी, भालावल, कोनशी, घारपी, पणतुर्ली, केरी.
देवगड - मणचे, कुणकेश्वर, वेंगुर्लेमधील सोन्सुरे, शेळपी, वायंगणी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.