विशेष गाड्यांना
सिंधुदुर्गात थांबा
कणकवली ः प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर सीएसएमटी-कन्याकुमारी सीएसएमटी व एलटीटी कन्याकुमारी-एलटीटी अशा दोन विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. दोन्ही गाड्यांना सिंधुदुर्गातील काही स्थानकांवर थांबा आहे. कन्याकुमारी सीएसएमटी ७ जानेवारीला दुपारी २.१५ वाजता कन्याकुमारी येथून सुटेल व दुसर्या दिवशी रात्री ९.५० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. गाडीला ठाणे, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली (रात्री ११.३० व स. १०.४६), सिंधुदुर्ग, सावंतवाडी, मडगाव, कारवार, उडपी मेंगलोर कन्नूर, एर्नाकुलम, नागरकोईल आदी स्थानकांवर थांबा आहे. कन्याकुमारी एलटीटी १४ व २१ जानेवारीला दुपारी २.१५ वाजता कन्याकुमारी येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी रात्री ९.५० वाजता एलटीटी येथे पोहोचेल. गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी, सावंतवाडी, मडगांव आदी स्थानकांवर थांबा असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
---------------
माजगाव सातेरीचा
शनिवारी जत्रोत्सव
ओटवणे ः जागृत देवस्थान व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले माजगावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव ७ जानेवारीला होत आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सातेरी देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. त्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे. रात्री सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर उशिरा पार्सेकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मानकरी तसेच ग्राम देवस्थान निधी कमिटीचे अध्यक्ष आनंद सावंत, सचिव विजय माधव आदींनी केले आहे.
--------------
दिव्यांग सवलत
आधारकार्ड ग्राह्य
सावंतवाडी ः अंध, अपंग, दिव्यांग व्यक्तींना एसटी सवलत प्रवासासाठी केंद्राकडून दिलेले ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. सद्यस्थितीत ज्या लाभार्थ्यांकडे हे ओळखपत्र (युडीआयडी) आहे, अशा लाभार्थ्यांस प्रवास भाड्यात सवलत नाकारली जात असल्याच्या तक्रारी आहेत. ४० टक्केपेक्षा जास्त अंपगत्व असणार्या दिव्यांग लाभार्थ्यांना प्रवास सवलतीसाठी केंद्राद्वारे दिलेले ओळखपत्र ग्राहय धरावे. हे ओळखपत्र लाभार्थ्यांकडे असताना वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी करू नये. तसेच ६५ टक्केपेक्षा जास्त अपंगत्व असणार्या दिव्यांग लाभार्थ्यांना साथीदारासह प्रवास करत असल्यास ओळखपत्राबरोबरच (युडीआयडी) आगार व्यवस्थापक यांच्यामार्फत पत्र क्रमांक १ अन्वये दिलेला नमुना दाखला आवश्यक आहे. याबाबत सूचना सर्व आगार प्रमुखांना दिल्याची माहिती नॅबचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी दिली.
-----------------
सेंट्रल एक्स्प्रेसच्या
वेळेमध्ये बदल
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावर धावणऱ्या व जिल्ह्यातील सिंधुदुर्गनगरी स्थानकावर थांबा असणऱ्या थिरुवनंतपूरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन-थिरुवनंतपूरम सेंट्रल एक्स्प्रेसच्या वडोदरा स्थानकावरील वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत वडोदरा स्थानकावर रात्री ११.५१ वाजता पोहोचून १२.११ वाजता सुटणारी थिरुवनंतपूर-हजरत निजामुद्दीन (२२६३३) ४ जानेवारीपासून रात्री ११.५१ वाजता पोहोचून ११.५९ वाजता सुटणार आहे. हजरत निजामुद्दीन-थिरुवनंतपूरम (२२६३४) ६ जानेवारीपासून सकाळी १०.५० वाजता पोहोचून १०.५८ वाजता सुटणार अशी, माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.