कोकण

चिपळूण - लोटेतील सीईटीपी तुंबली

CD

फोटो ओळी
-rat१७p३४.jpg ः KOP२३L७६२७०
लोटे ः सीईटीपीचे संग्रहित छायाचित्र.
-------------

तर उद्योगांना उत्पादन बंद ठेवावे लागणार

लोटेतील सांडपाण्यावरील प्रक्रियेची समस्या; सीईटीपीतील गाळ उपसा थांबवला
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता.१७ः लोटेतील सीईटीपीने उद्योगांचा डिस्चार्ज केवळ एका तासांवर आणून ठेवल्याने सर्वाचे ईटीपी प्रकल्प भरले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत मार्ग न निघाल्यास उद्योगांना उत्पादन बंद ठेवण्याची वेळ येणार असल्याने हे एक नवे संकट सर्वांसमोर उभे ठाकले आहे. लोटे उद्योजक संघटनेचे अध्यक्ष आणि आवाशी सरपंच अॅड. राज आंब्रे यांनी केलेल्या तक्रारीनुसार सीईटीपीतील गाळ उपसा एमआयडीसीने थांबवला आहे. मध्येच काम बंद करावे लागल्याने रासायनिक सांडपाण्यावरील प्रक्रिया करणे अशक्य बनले आहे.

लोटेतील सीईटीपीने गेल्या काही वर्षात अध्यक्ष सतीश वाघ यांच्या नेतृत्वाखाली कात टाकली आहे. एमआयडीसी आणि एमपीसीबी यांच्याकडून प्रकल्पाच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केल्यामुळे सांडपाण्याच्या व्यवस्थापनामध्ये आमुलाग्र बदल झाला. त्यामुळे सध्या हा प्रकल्प संपूर्ण राज्यातील सीईटीपींसाठी आदर्शवत असा प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे. असे असतानाच सध्या या प्रकल्पाच्या विरोधात तक्रारींचा ससेमिरा सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रकल्पातील साठलेला गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवत हे काम स्थानिक ठेकेदाराला देण्यात आले. त्यानुसार काही दिवसांपासून गाळ काढणे सुरू झाले. दोन दिवसांपूर्वीच एमआयडीसीने गाळ काढण्याचे काम थांबवले. उद्योजक संघटनेचे अध्यक्ष आणि आवाशीचे सरपंच आंब्रे यांनी गाळ साठवणुकीवर आक्षेप घेत तक्रार केल्याने एमआयडीसीने पुढील कार्यवाही केली; मात्र नियमानुसार आणि सर्व परवानगी, सुरक्षेबाबतचे काटेकोर पालन करत असतानाही काम थांबवल्याने मोठे संकट उद्योगांपुढे उभे राहिले आहे. ३ एमएलडी सांडपाण्याची क्षमता असताना सध्या केवळ १ एमएलडी सांडपाणी घेऊन प्रक्रिया केली जात असल्याने उद्योगांना उत्पादन काढणेही अवघड होऊन बसले आहे.

कोट
सीईटीपीतील गाळ काढण्याचे काम अर्धवट आहे. उद्योगांतून आलेले सांडपाणी साठवून ठेवण्यास जागाच शिल्लक नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. डी सम्प परिसरात गाळाची साठवणूक केली जात आहे. १५ मेपर्यंत गाळ उन्हात राहून तो घट्ट झाल्यानंतर तळोजा येथील वेस्ट मॅनेजमेंटमध्ये विल्हेवाटीसाठी पाठवला जाणार आहे. पर्यायी व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे.
- भूषण शिंदे, व्यस्थापक सीईटीपी

कोट
सीईटीपीतून निघणारा गाळ साठवण्यासाठी एमआयडीसीने डी सम्प परिसरात जागा उपलब्ध करून दिली आहे. गाळ साठवण्यासाठी एमपीसीबीकडून परवागी घेणे आवश्यक आहे. तशी सूचना आम्ही सीईटीपीला केली आहे.
- किशोर हळदणकर, सहाय्यक अभियंता, एमआयडीसी खेर्डी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : हिंजवडीमध्ये १८ तासांपासून बत्ती गूल

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT