कोकण

साडवली - हातिव नं. 1 शाळेचे नाचणी मळणी यंत्र तालुक्यात अव्वल

CD

rat१८p३८.jpg, rat१८p३९.jpg
76528; 76529
देवरूखजवळील हातीव शाळा नं. १ चे नाचणी मळणी यंत्र अव्वल.

विज्ञान प्रदर्शनात नाचणी मळणी यंत्र अव्वल
हातिव नं. १ शाळा ; कमी खर्चाचे,सहज नेता येण्याजोगे
साडवली, ता. १८ः संगमेश्वर तालुक्याचे ५० वे विज्ञान प्रदर्शन शिवाजी माध्यमिक विद्यालय कोसुंब येथे पार पडले. कोकणातील लोकांचे नाचणी हे एक महत्वाचे पीक आहे. या पिकासाठी उपयुक्त आणि सोयीस्कर यंत्र अद्याप बाजारात उपलब्ध झालेले नाही, ही गरज लक्षात घेऊन हातिव नं. १ शाळेचे नाचणी मळणी यंत्र बनवले. पारंपरिक पद्धतीने आजही नाचणीची मळणी केली जाते याचा विचारही यामागे होता.
तालुक्यातील बहुतांश शाळांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये हातिव नं. १ शाळेच्या नाचणी मळणी यंत्राला तालुक्यात प्राथमिक गटात प्रथम क्रमांक मिळाला. हे यंत्र दुर्वांक नार्वेकर आणि दिशा कोटकर यांनी शिक्षक सुनील करंबेळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले आहे. कोकणातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून, नाचणी हे एक महत्वाचे पीक आहे. या पिकासाठी उपयुक्त आणि सोयीस्कर यंत्र अद्याप बाजारात उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने आजही नाचणीची मळणी केली जाते याचा विचार करून आम्ही हे यंत्र तयार केले, असे करंबेळे यांनी सांगितले. हे यंत्र सहजरित्या कोठेही ने-आण करता येते शिवाय यामुळे शेतकऱ्याचे श्रम व वेळेची बचत होते. हे यंत्र अतिशय कमी खर्चात बनवता येते. यामुळेच हे यंत्र परीक्षकांच्या पसंतीस उतरले. आता हे यंत्र दापोली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुक्याचे नेतृत्व करणार आहे. या यंत्राला बहुउद्देशीय यंत्र बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे करंबेळे म्हणाले.
हे यंत्र बनवण्यासाठी पदवीधर शिक्षक विनय होडे, रूपाली मांगले व श्रीकांत केसरकर यांचे सहकार्य लाभले. हातिव शाळेची ही चौथी प्रतिकृती तालुक्यात अव्वल ठरली आहे. यापूर्वी यांत्रिक मिक्सर, कुंभाराचे चाक, हिर सोलणी यंत्र, बहुउद्देशिय कुबडी अशा प्रकल्पांनी तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. रोहन बने यांच्या हस्ते व आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unseasonal Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा! जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिटीची शक्यता

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 मे 2024

अग्रलेख : कोसळणारे भ्रष्ट मनोरे...

Water Storage : राज्यात केवळ २५ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT