कोकण

उद्योगांत ऊर्जा व्यवस्थापन गरजेचे

CD

78889
कुडाळ ः भगवान परब यांच्या सत्कार प्रसंगी अमोल पाठक, सुनील धनावडे, उमेश गाळवणकर, मोहन होडावडेकर, अॅड. नकुल पार्सेकर आदी.


उद्योगांत ऊर्जा व्यवस्थापन गरजेचे

भगवान परब ः कुडाळ येथे उद्योजकांना मार्गदर्शनपर कार्यक्रम


कुडाळ, ता. २९ ः एखाद्या संस्थेच्या विकासासाठी जसे संघटनात्मक कौशल्य, कार्यपद्धती, विविध समुहांशी परस्पर स्नेहसंबंध, कृती कार्यक्रम आणि इच्छित ध्येय गाठण्यासाठी कामाचे सातत्य महत्त्वाचे असते, तसेच उद्योग क्षेत्रातही प्रत्येक व्यक्तीकडे असणाऱ्या उर्जेचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे योग्य नियोजन केल्यास सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात, असे प्रतिपादन या क्षेत्रातील मुंबई येथील अभ्यासक, मार्गदर्शक भगवान परब यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एमआयडीसी असोसिएशन कुडाळ व बॅ. नाथ पै. शैक्षणिक संस्था कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. मानवी कार्यक्षमता, दर्जा, पत याच्यावर मानवी उर्जेचा सकारात्मक परिणाम कसा होतो, याबाबत त्यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. यावेळी परब यांचा दोन्ही संस्थांच्या वतीने कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्गचे पोलिस निरीक्षक सुनील धनावडे, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमेश गाळवणकर, असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, सचिव अॅड. नकुल पार्सेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच उद्योजक संजीव कर्पे, राजू केसरकर, शशिकांत चव्हाण, कुणाल वरसकर, डॉ. नितीन पावसकर, अमित वळंजू, राजन नाईक, संजीव प्रभू, आर. एस. गवस, मुश्ताक शेख, शशिकांत चव्हाण, सिध्दी बिरमोळे, व्यंकटेश भंडारी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी, असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. अरुण मर्गज यांनी सूत्रसंचालन केले. सचिव अॅड. नकुल पार्सेकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतात पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरे काय म्हणाले?

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT