कोकण

पं. गोविंदराव पटवर्धन यांना मानवंदना

CD

rat०१११.txt

(टुडे पान ४ साठी)

फोटो ओळी
- rat१p१२.jpg-
७९७००
रत्नागिरी : संगीत नाट्य स्पर्धेदरम्यान पं. गोविंदराव पटवर्धन यांना ऑर्गनवादनातून आदरांजली वाहताना बालकलाकार श्रीरंग जोगळेकर. सोबत तबलासाथीला धनंजय पुराणिक.
----
ऑर्गनवादक पं. गोविंदराव पटवर्धन यांना मानवंदना

रत्नागिरी, ता. १ : मूळचे अडूर (ता. गुहागर) येथील महान ऑर्गनवादक पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या सत्ताविसाव्या स्मृतिदिनानिमित्त ऑर्गन वादनाने त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
पं. गोविंदराव यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून ऑर्गन वादन साथ करण्यास सुरूवात केली. भारतातील सर्व दिग्गज शास्त्रीय गायक कलाकारांबरोबरच, तसेच सुमारे १५ हजारहून अधिक नाट्यप्रयोगांना ऑर्गनसाथ केली आहे. संगीत नाटकांसाठी नटवर्य भालचंद्र पेंढारकर, पं. राम मराठे, पं. कुमार गंधर्व, पं. छोटा गंधर्व यांना ते गुरुस्थानी मानत असत.

रत्नागिरीत सुरू असलेल्या ६१ व्या संगीत राज्य नाट्य नाट्य स्पर्धेत सं. अवघी विठाई माझी या नाटकाच्या प्रयोग झाला. नाट्याच्या एका अंकानंतर परीक्षक मुकुंद मराठे, रवींद्र कुलकर्णी, भवानीशंकर तथा संजय गोगटे, मेधा गोगटे आणि धनंजय पुराणिक यांच्या कल्पनेतून हा छोटेखानी कार्यक्रम झाला. रत्नागिरीतील बालकलाकार श्रीरंग हेरंब जोगळेकर याने संगीत मानापमानमधील नाट्यपद ऑर्गनवर सादर केले. त्याला परीक्षक धनंजय पुराणिक यांनी तबलासाथ केली. यावेळी उपस्थित रसिकांनी आणि कलाकारांनी पं. गोविंदराव पटवर्धन यांना मानवंदना दिली.

-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT