कोकण

काजू बोंडाचे पेय पदार्थ

CD

सदर ः कृषी संस्कृती
--
81339
डॉ. विलास सावंत


काजू बोंडाचे पेय पदार्थ

काजू हे कोकणातील मुख्य फळपीक आहे. कोकणात काजू बी व काजू टरफल प्रक्रिया मोठ्या प्रमाणात केली जाते. त्या तुलनेत काजू बोंडाची प्रक्रिया अत्यंत कमी प्रमाणात होते. त्यामुळे जवळपास ९० टक्के काजूची बोंडे प्रक्रियेअभावी वाया जातात. वाया जाणाऱ्या काजू बोंडापासून सरबत, सिरप, स्क्वॅश, जॅम, चटणी, कॅन्डी, नेक्टर, काजू फेणी, लोणचे, बर्फी, पावडर असे अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. काजू बोंडामध्ये पाणी ८७.९टक्के, प्रथिने ०.२ टक्के, स्निग्ध पदार्थ ०.१ टक्के, पिष्टमय पदार्थ ११.६ टक्के व ‘क’ जीवनसत्व २६८ मिलीग्रॅम प्रती १०० ग्रॅम फळात असते.
- डॉ. विलास सावंत, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस
.................
काजू बोंडापासून सरबत तयार करण्यासाठी चांगली पक्व, ताजी बोंडे निवडावीत. निवडलेली काजू बोंडे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. ही बोंडे मलमलच्या कापडात बांधून २ टक्के (२० ग्रॅम मीठ प्रतिलिटर पाणी) मिठाच्या द्रावणात १० ते १५ मिनिटे शिजवून घ्यावीत. सर्व बोंडे मिठाच्या द्रावणातून बाहेर काढून स्वच्छ पाण्यात थंड होण्यासाठी ठेवावीत. थंड झाल्यावर बोंडातील रस बास्केट प्रेसच्या सहाय्याने काढून घ्यावा. काढलेल्या ५०० ग्रॅम काजू बोंडाचा रस हा ३ ते ४ तास मोठ्या स्टीलच्या पातेल्यात तसाच ठेवावा. त्यामुळे रसातील जड कण पातेल्याच्या तळाशी बसतील. पातेल्यातील वरचा रस दुसऱ्या पातेल्यात मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. या गाळलेल्या रसात साखर १५० ग्रॅम, सायट्रिक आम्ल २ ते ३ ग्रॅम, पाणी ३५० मि.लि. हे सर्व घटक चांगले मिसळून मिश्रण पुन्हा मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. नंतर १० मिनिटे मिश्रण गरम करून ३ ग्रॅम पोटॅशियम मेटाबायसल्फाईड त्यात मिसळावे. ते गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीत भरावे. नंतर बाटल्या त्वरित बंद करून बाटल्या उकळत्या पाण्यात ३० मिनिटे बुडवून ठेवाव्यात. त्यांनतर बाटल्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात. काजू बोंडापासून सिरप करण्यासाठी बोंडापासून रस काढून घ्यावा. १ किलो रसासाठी २ किलो साखर व ३० ग्रॅम सायट्रिक आम्ल एकत्र मिसळून साखर विरघळेपर्यंत गरम करावे. मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. नंतर त्यामध्ये सोडियम बेंझोऐट हे परिरक्षक ७१० मिलीग्रॅम प्रती किलो या प्रमाणात मिसळावे. अशा प्रकारे तयार केलेला सिरप निर्जंतुक केलेल्या बाटलीत भरावा. बाटल्यांचे झाकण लावून हवाबंद कराव्यात. बाटल्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात. काजू सिरपमध्ये त्याच्या चारपट या प्रमाणात पाणी मिसळून काजू सरबत तयार करून आस्वाद घ्यावा.
----
असा बनतो काजू स्क्वॅश
काजू बोंडापासून स्क्वॅश तयार करण्यासाठी काजू बोंडापासून रस काढून घ्यावा. १ किलो काजू स्क्वॅश तयार करण्यासाठी ३०० ग्रॅम काजू बोंडाचा रस, ४०० ग्रॅम साखर, ७५ ग्रॅम सायट्रिक आम्ल व ३५० मि.लि. पाणी एकत्र मिसळून मलमलच्या कापडातून पुन्हा गाळून घेऊन १० मिनिटे गरम करावे. गरम असतानाच त्यात ७५० मिलीग्रॅम पोटॅशियम मेटाबायसल्फाईड हे परिरक्षक मिसळावे. तयार झालेला स्क्वॅश निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरून हवाबंद करून थंड व कोरड्या जागेवर साठवून ठेवावे. काजू स्क्वॅशपासून सरबत तयार करताना त्यामध्ये दोन ते तीन पट पाणी टाकून थंड करून पिण्यासाठी वापरावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 : भारताचा आज ओमानविरुद्ध अखेरचा साखळी सामना; संजू सॅमसन, जसप्रीत बुमराहला विश्रांती? कशी असेल प्लेईंग XI?

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्याला इडली-पोह्याचा कंटाळा आलाय? मग बनवा झटपट सुरतचा फेमस लोचो, लगेच नोट करा रेसिपी

Latest Marathi News Updates : म्हैसूर दसरोत्सव उद्‍घाटन वाद सर्वोच्च न्यायालयात; आज सुनावणी

Panchang 19 September 2025: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

SCROLL FOR NEXT