कोकण

दर पडल्याने कलिंगड उत्पादक अडचणीत

CD

L81588
.............................

swt९१०.jpg
८१५१७
वैभववाडीः जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातच मोठ्या प्रमाणात माल पडून आहे.
swt९९.jpg
८१५२५
वैभववाडीः काढणी केलेला माल व्यापारी खरेदी करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

कलिंगड उत्पादक संकटात
दर पडल्याने सिंधुदुर्गात शेकडो टन माल शेतात पडून; करार नसणारे अडचणीत
एकनाथ पवारः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ९ः मागणीपेक्षा जास्त उत्पादन आणि गोवा बाजारपेठेत कर्नाटकमधून आलेला मोठ्या प्रमाणात माल यामुळे कलिंगडच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शेकडो टन कलिंगड शेतातच पडून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो कलिंगड उत्पादक आर्थिक संकटात सापडले असून भविष्यात कलिंगड लागवडीवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे.
७५ ते ८० दिवसांमध्ये उत्पादन मिळत असल्यामुळे जिल्ह्यात गेल्या काही वर्षात कलिंगड लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली. २०२० मध्ये कोरोनामुळे हजारो टन माल शेतातच सडला. कलिंगड उत्पादकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. त्यामुळे २०२१ मध्ये अनेक शेतकऱ्यांनी कलिंगड लागवड केली नाही. २०२२ मध्ये देखील कोरोनाच्या संभाव्य शक्यतेने अनेकांनी कलिंगड लागवड केली नाही. परंतु, ज्या काही मोजक्या शेतकऱ्यांनी कलिंगड लागवड केली. त्यांना विक्रमी प्रतिकिलो १८ ते २० रूपयांपर्यत दर मिळाला. अनेक शेतकऱ्यांना कलिंगड लागवडीतुन चांगला नफा झाला. हंगामाच्या अखेरपर्यत प्रतिकिलो १२ ते १४ रूपयांपर्यत दर मिळाला. त्यामुळे गेल्यावर्षी चांगला दर मिळाल्यामुळे यावर्षी देखील चांगला दर मिळेल, या शक्यतेने शेकडो शेतकऱ्यांनी कलिंगड लागवड केली. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये लागवडीचे प्रमाण सर्वाधिक राहीले. त्या कालावधीतील उत्पादन वीस दिवसांपासून तयार व्हायला सुरूवात झाली.
मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडी, कणकवली या तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध जातीचा शेकडो टन माल एकाच वेळी परिपक्व झाला. एकाच वेळी शेकडो टन उत्पादन तयार झाल्यामुळे आणि त्याचवेळी कलिंगडकरीता मोठी बाजारपेठ असलेल्या गोवा बाजारपेठेत कर्नाटकमधील कलिंगड मोठ्या प्रमाणात आले. त्यामुळे कलिंगडचा दर घसरला. हा दर सध्या पाच ते सहा रूपयांपर्यत घसरला आहे. परंतु, त्या दराने देखील व्यापारी कलिंगड खरेदी करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा माल शेतातच सडत आहे. शेतकऱ्यांशी करार केलेले व्यापारी काही प्रमाणात त्या-त्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत आहेत. परंतु, ज्या शेतकऱ्यांचा करार नाही, त्यांचा माल मात्र शेतातच कुजत असल्याचे चित्र दिसुन येत आहे. कलिंगडला साधारणपणे प्रतिकिलो चार ते पाच रूपये उत्पादन खर्च येतो. परंतु, त्या दराने देखील कलिंगड खरेदी करण्यास कुणी तयार होत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून आर्थिक विवंचनेत आहे. त्यामुळे यावर्षी कलिंगड लागवड केलेल्या उत्पादकांचे कंबरडेच मोडले आहे.

कोट
मी दोन एकरमध्ये कलिंगड लागवड केली होती. माझ्याकडे सुमारे २० टन माल होता. उत्पादनखर्चा इतका देखील दर देण्यास कुणी व्यापारी तयार नाही. त्यामुळे सर्व माल शेतातच पडून आहे. माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
- विश्वंभर परब, कलिंगड उत्पादक शेतकरी, वराड, मालवण

कोट
एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत आला. याशिवाय गोवा बाजारपेठेत कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात कलिंगड आल्यामुळे दर घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकाच वेळी लागवड न करता टप्पाटप्प्याने करणे आवश्यक आहे.
- दिपक कासोटे, कलिंगड उत्पादक शेतकरी, गडमठ

चौकट
दृष्टिक्षेपात...
* कलिंगडचे दर ४ ते ५ रूपयांवर
* उत्पादन खर्च प्रतिकिलो ४ ते ५ रूपये
* गेल्यावर्षी कलिंगडला प्रतिकिलो १२ ते २० रूपयांपर्यत दर
* कर्नाटकमधील माल मोठ्या प्रमाणात गोवा बाजारपेठेत
* व्यापाऱ्यांकडून देखील शेतकऱ्यांची कोंडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT