rat१७१४.txt
बातमी क्र.. १४ (पान २ साठी मेन )
फोटो ओळी
-rat१७p१.jpg-
८३३७१
रत्नागिरी ः ''सकाळ'' प्रकाशन आणि स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आर्थिक समृद्धीचे मंत्र या कार्यक्रमात बोलताना लेखक प्रफुल्ल वानखेडे. डावीकडून प्रसाद जोशी, धनंजय कुलकर्णी, राजेंद्र काळे आणि शिरीष दामले.
(मकरंद पटवर्धन ः सकाळ छायाचित्रसेवा)
--
(पैसे कमवताना वाचनही वाढवा)
पैसा कमवायला लागलात की वाचनही वाढवा
प्रफुल्ल वानखेडे; पैसा, आर्थिक साक्षरता एकाच नाण्याच्या बाजू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः कोकण ही प्रामाणिक माणसांची भूमी आहे. त्यामुळे इथे सकारात्मकताही ठासून भरलेली आहे. पैसा कमवायला लागलात की वाचनही वाढवा. शिक्षण, नेगोसिएशन्स, सेल्स व मार्केटिंग, वेळेचे आणि आपत्तीचे व्यवस्थापन करायला शिका. प्राधान्यक्रम ठरवता आला पाहिजे. श्रीमंत व्हायला लागलात तरी तुम्ही आपल्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या मित्रमंडळींची संख्याही वाढली पाहिजे. कोकणात काजूप्रक्रिया, बांबू, पानांपासून प्लेट बनवणे, नारळाच्या दुधापासून पावडर बनवणे अशा अनेक उद्योगसंधी आहेत, असे प्रतिपादन ''गोष्ट पैशापाण्याची'' पुस्तकाचे लेखक, उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांनी केले.
''सकाळ'' प्रकाशन आणि स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने ''आर्थिक समृद्धीचे मंत्र'' या विषयावर लेखक वानखेडे बोलत होते. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सभागृहात या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा प्रतिसाद मिळाला. १९५ वर्षांच्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे भरभरून कौतुक केले. कोकणात वाचनालये, शिक्षणसंस्था या एवढ्या जुन्या आहेत त्यांचा वारसा रत्नागिरीला लाभला आहे सांगून वानखेडे म्हणाले, कोकण ही सुवर्णभूमी आहे. येथे यश व अमाप संपत्ती दडली आहे. पैसा मिळवताना आपण मित्र, कुटुंब जोडले पाहिजे. फिरायला जा, छंद जोपासा, जगणं समृद्ध करा. आलेल्या पैशांचे नियोजन करता आले पाहिजे. पैसा व आर्थिक साक्षरता या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. एकाच गोष्टीत गुंतवणूक न करता विविध गोष्टींमध्ये करा. वाचनामुळे आपल्याला चुका कळतात व आपण त्या टाळून यशस्वी होण्याच्या मार्गाकडे वळतो. पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधा. कोकणात दळणवळणाच्या सुविधा वाढल्यानंतर कायापालट होणार आहे.
बँक ऑफ इंडियाचे रत्नागिरी उपविभागीय व्यवस्थापक राजेंद्र काळे यांनी सांगितले, रत्नागिरीसारख्या छोट्या शहरात आर्थिक व्याख्यानाचा उपक्रम ''सकाळ'' राबवत आहे, ही खूप चांगली व अनुकरणीय गोष्ट आहे. आर्थिक साक्षरता बॅंकासुद्धा हाताळतात. जनधन योजनेमध्ये आज ४७ कोटी ५० लाख खाती उघडली गेली आणि त्यात सुमारे १०७५ लाख कोटी रुपये जमा आहेत. जे पैसे घरात, डब्यात होते ते बॅंकिंग चॅनेलमध्ये आले व त्यातून कर्जपुरवठा होत आहे. आवृत्तीप्रमुख शिरीष दामले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दत्तप्रसन्न कुळकर्णी यांनी केले.
--
आर्थिक साक्षर व्हा
आर्थिक साक्षरता महत्वाची आहे. गुंतवणूक योग्यप्रकारे केली पाहिजे. आवाहन, सूचना देऊनही ग्रामीण भागात ओटीपीद्वारे सायबर क्राईम घडतो. आपण माहिती घेऊनच कार्यवाही केली पाहिजे. लेखक वानखेडे यांनी दिलेला मंत्र वापरून आपण योग्यप्रकारे आर्थिक नियोजन करा.
धनंजय कुलकर्णी रत्नागिरी पोलिस अधीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.