कोकण

राजापूर-चिखलगावच्या विद्यार्थ्यांनी रेखाटली शस्त्रे आणि किल्ले

CD

फोटो ओळी
-rat२०p१४.jpg ः राजापूर ः विद्यार्थ्यांनी रेखाटलेली शस्त्रांची चित्रे.
-rat२०p१२.jpg ः KOP२३L८४०२२विद्यार्थ्यांनी रेखाटलेले किल्ले.
------------

चिखलगावच्या विद्यार्थ्यांनी रेखाटली शस्त्रे आणि किल्ले

शिवजयंती ; शाळेतील प्रदर्शनाचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २० ः हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी गनिमांशी युद्ध करण्यासाठी वापरलेल्या विविधांगी शस्त्रांचे सार्‍यांनाच आकर्षण असते. ही सारी शस्त्रे चित्राच्या माध्यमातून तालुक्यातील चिखलगाव येथील विद्यार्थ्यांनी रेखाटली आहेत. त्यामध्ये विविधांगी शस्त्रांसह छत्रपती शिवाजी महाराजांनी सर केलेले विविधांगी किल्ले, राजमुद्रा आदी विविध प्रकारच्या २८ चित्रांचा समावेश आहे. या चित्रांच्या माध्यमातून गनिमांना अस्मान दाखवणारी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांनी वापरलेल्या शस्त्रांची माहिती आणि स्वराज्याची माहिती या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून सार्‍यांसमोर मांडली आहे.
विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या या चित्रांचे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने रविवारी (ता. १९) प्रशालेमध्ये भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचे आमदार राजन साळवी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख कमलाकर कदम, विधानसभा समन्वयक प्रकाश कुवळेकर, विभागप्रमुख संतोष हातणकर, सरपंच योगेश नकाशे, गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यामिनी नकाशे, अ‍ॅड. महेश नकाशे आदी उपस्थित होते. शिक्षक समीर देशपांडे, मुख्याध्यापक विजय खांडेकर आणि शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी ही चित्रे रेखाटली आहेत.
विद्यार्थ्यांना शिवकालीन युद्ध साहित्याचा परिचय व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये इतिहास विषयाची कलेच्या माध्यमातून आवड निर्माण व्हावी या उद्देशाने तालुक्यातील चिखलगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ’चित्रातून इतिहास शिक्षणाचा’ एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यामध्ये गनिमांशी लढा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांनी वापरलेल्या विविधांगी शस्त्रे विद्यार्थ्यांनी कुंचल्याच्या साहाय्याने कागदावर रेखाटली आहेत. त्यामध्ये मनस्वी नारकर, स्विंजल जाधव, प्रज्योत विचारे, शार्दुल सुर्वे, आर्या कुडकर, वेदिका जड्यार, गौरी सुर्वे, आराध्या जड्यार, स्वरूप सुर्वे, दुर्वेश नारकर, जान्हवी नकाशे, हर्षिता सुर्वे, निधी विचारे, ज्ञानदा बंडगर या विद्यार्थ्यांनी २८ चित्रे काढली आहेत. या चित्रांमध्ये खंजर, कट्यार, समशेर, विळा, अंकुश, तलवार, बिचवा, वेध अशा अनेक युद्ध हत्यारांसह राजगड, शिवनेरी, प्रतापगड अशा प्रमुख गडांची चित्रे, शिवरायांची राजमुद्रा, शहाजी राजे आदी चित्रांचा समांवेश आहे.

कोट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्धात वापरली जाणारी अनेक हत्यारे होती. त्यामध्ये सुक्ष्म फरक होता. तलवार आणि समशेर यामध्ये त्यांची मूठ आणि पात्याची वक्रता यामध्ये थोडा फरक आहे. त्याचा परिचय मुलांना होण्यासाठी ही चित्रं फळ्यावर काढून दाखवली. ती चित्रं बघून काढण्याचा सराव करून घेतला. प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एकतरी हत्यार रेखाटन करण्यास प्रवृत्त करून तसे नियोजन करून कागद दिले आणि वर्गामध्येच विद्यार्थ्यांनी चित्रे काढली.
- समीर देशपांडे, शिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT