कोकण

rat2134.txt

CD

फोटो ओळी
-rat२१p४८.jpg-KOP२३L८४४२० रत्नागिरी : संगीत राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारा परस्पर सहाय्यक मंडळाच्या संगीत मंदारमाला नाटकाचा चमू. (छायाचित्र- प्रसाद जोशी, रत्नागिरी)
-rat२१p५१.jpg-KOP२३L८४४३८
रत्नागिरी ः राज्य नाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवलेल्या सं. मल्लिका नाटकाचा चमू.
------------

सं. राज्य नाट्य स्पर्धा--लोगो

वाघांबेतील ''संगीत मंदारमाला''ने मारली बाजी

रत्नागिरीचे मल्लिका द्वितीय ; परस्पर सहाय्यक मंडळ सलग दुसऱ्या वर्षी प्रथम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत परस्पर सहाय्यक मंडळ, (वाघांबे, मुंबई) या संस्थेच्या संगीत मंदारमाला या नाटकाने पाच वैयक्तिक पारितोषिकांसह बाजी मारली. सलग दुसऱ्या वर्षी या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही स्पर्धा स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात गेले महिनाभर रंगली.
महाराष्ट्र, गोव्यातील २३ संस्थांनी संगीत नाटके सादर केली. उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या या केंद्रातील नाटकामध्ये कलारंग नाटय प्रतिष्ठान, वरवडे, खंडाळा या संस्थेच्या ''संगीत मल्लिका'' या नाटकास द्वितीय तर सान्वी कला मंच, मांद्रे-गोवा या संस्थेच्या ''संगीत अयोध्येचा ध्वजदंड'' या नाटकास तृतीय पारितोषिक मान मिळाला आहे. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मुकुंद मराठे, धनंजय पुराणिक, भवानीशंकर गोगटे, मेधा गोगटे-जोगळेकर आणि रवींद्र कुलकर्णी यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.
गेल्या वर्षीच्या स्पर्धेतही वाघांबेतील परस्पर सहाय्यक मंडळाने गेल्या वर्षी ७ वैयक्तिक बक्षीसांसह सुवर्णतुला नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला होता. यंदासुद्धा या मंडळाने प्रथम क्रमांकावर नाव कोरत आगळा ठसा उमटवला आहे.
----------

चौकट १
सविस्तर निकाल असा (प्रथम व द्वितीय क्रमांक या क्रमाने)
*दिग्दर्शन: घनश्याम जोशी (मंदारमाला), नितीन जोशी (मल्लिका)
*नाटयलेखन: अमेय धोपटकर (मल्लिका), विलास कर्वे (तमसो मा ज्योतिर्गमय)
*संगीत दिग्दर्शक : विजय रानडे (मल्लिका), नीलकंठ गोखले (तमसो मा ज्योतिर्गमय)
* नेपथ्य : पायल लोगडे (मंदारमाला), अक्षय शेटगावकर (रणदुंदुभी)
*संगीत ऑर्गन ः हर्षल काटदरे (मंदारमाला), सुनाद कोरगावकर (रणदुंदुभी)
*संगीत तबला ः प्रथमेश शहाणे (मंदारमाला), सुविशांत बोर्डेकर (एकच प्याला)
*उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक- पुरुष समीर शिरोडकर (अयोध्येचा ध्वजदंड), मुकुंद वसुले (मत्स्यगंधा)
* उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक- शारदा शेटकर (रणदुंदुभी), यामिनी पायघन (संगीत मत्स्यगंधा)
* गायन रौप्यपदक- विशारद गुरव (मंदारमाला), गोविंद मराठे (एकच प्याला),
* गायन रौप्यपदक- जान्हवी खडपकर (मल्लिका), उर्वी फडके (एकच प्याला).
* अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे- धनश्री गाडगीळ (मेघमल्हार), करुणा पटवर्धन (कटयार काळजात घुसली), शरण्या शेणॉय (माऊली), सौम्या आठल्ये (मल्लिका), पूजा लागू (तमसो मा ज्योतिर्गमय), विघ्नेश नाईक (हे बंध रेशमाचे), वसंत शेटगावकर (रणदुंदुभी), स्वानंद देसाई (कटयार काळजात घुसली), सुहास संत (नात्याचं गणित), अभिषेक जोशी (तमसो मा ज्योतिर्गमय).
* गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे- सावनी शेवडे (सौभद्र), तन्वी मोरे (मल्लिका), श्रध्दा जोशी (अयोध्येचा ध्वजदंड), सरोज पालडिया (त्रिवेणी), देवश्री शहाणे (मंदारमाला), सुरज शेटगावकर (अवघी विठाई माझी), कैलास खरे (कट्यार काळजात घुसली), शिवम रायकर (सूरसाधक), दशरथ नाईक (अयोध्येचा राजदंड), सुधांशु सोमण (सौभद्र).
-------
कोट....
संगीत नाट्य स्पर्धेचा अपेक्षित निकाल.
अमेय धोपटकर लिखित नवी संहिता संगीत मल्लिका घेऊन यावर्षी आम्ही संगीत राज्य नाट्य स्पर्धेसाठी उतरलो. गायक, कलाकार असे सर्व टिमने अतिशय मेहनत घेतली आणि या मेहनतीचे फळ आम्हाला मिळाले. यावर्षी अपेक्षित निकाल पाहायला मिळाला असल्याची प्रतिक्रिया सकाळशी बोलताना संगीत मल्लिका या नाटकाचे दिग्दर्शक ज्येष्ठ रंगकर्मी नितीन जोशी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

SCROLL FOR NEXT