कोकण

चिपळुणात 22 थकबाकीदारांचा थांबवला पाणीपुरवठा

CD

rat२३३३.txt

बातमी क्र. .३३ ( पान ३ )

फोटो : ratchl२२३.jpg ः
८४८३७
चिपळूण ः नागरिकांचे नळ कनेक्शन तोडताना पालिका कर्मचारी.

चिपळुणात २२ थकबाकीदारांचे पाणी बंद

३ मालमत्ता सील तर ११ लाखांची वसुली

चिपळूण, ता. २३ ः नगर पालिकेच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत पाणीपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शहरातील २२ थकबाकीदारांना पाणीपट्टी वसुली पथकाने जोरदार झटका दिला आहे. बुधवारी कर व पाणीपट्टी वसुलीची मोहीम राबवताना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचा नळपाणी पुरवठाच बंद करत कारवाईचा बडगा उगारला तर दिवसभरात ३ मालमत्ता सील करताना ११ लाखांची वसुली केली.
पाणीपट्टी वसुली पथकाने आजपर्यंत ७४ नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई केली आहे. बुधवारी एकाच दिवशी तब्बल २२ थकित नळ कनेक्शन खंडित केले गेले आहेत. थकित पाणीपट्टी खूप मोठ्या प्रमाणात आहे. पाणीपट्टीमध्ये दंड नाही तरीही नागरिक ती भरायचे टाळतात. खंडित केलेले नळ कनेक्शनची पूर्ण रक्कम भरून पावती सादर केल्यानंतर नळ कनेक्शन पूर्ववत केले जात आहे. नगर पालिका कर्मचारी सचिन जाधव, अजय मनोरकर, वासुदेव राऊत हे गेले दोन महिने पाणीपट्टी वसुली कामासाठी झटत आहेत. शहरात एकूण थकित पाणीपट्टीसहित २ कोटी ५० लाख मागणी असून, त्यापैकी आजपर्यंत केवळ ८५ लाख रुपये वसूल झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT