कोकण

रत्नागिरी- गुढीपाडवा स्वागतयात्रा

CD

रत्नागिरीत निघणार गुढीपाडवा स्वागतयात्रा
नियोजनासाठी बैठक ; ७५ चित्ररथ होणार सहभागी
रत्नागिरी, ता. २६ : प्रतिवर्षाप्रमाणे अठराव्या वर्षी येथे हिंदू नववर्ष गुढीपाडवा स्वागतयात्रा मोठ्या जल्लोषात काढण्यात येणार आहे. ग्रामदेवता श्री देव भैरी मंदिर ते समाजमंदिर श्री पतितपावन मंदिरापर्यंत निघणाऱ्या या यात्रेत ७५ पेक्षा जास्त चित्ररथ सहभागी होणार आहेत. पारंपरिक वेशभूषेत हजारो हिंदू बंधू-भगिनी या स्वागतयात्रेत सहभागी होणार आहेत. या यात्रेच्या संदर्भातील नियोजन बैठक रविवारी (ता. २६) सायंकाळी पतितपावन मंदिरात झाली.
या बैठकीत श्री देव भैरी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र सुर्वे यांनी सर्वांना आवाहन केले की दरवर्षी आपण या स्वागतयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होतो. श्री भैरी मंदिरात गुढी उभी केल्यानंतर ९ वाजता स्वागयात्रेला सुरवात होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने हिंदू बंधू-भगिनींनी यामध्ये सहभागी व्हावे. यात्रेच्या प्रचारासाठी वाहन फेरी काढण्यात येईल. तसेच नियोजनाची आणखी बैठकही आयोजित करण्यात येणार आहे.
झाडगाव येथील भैरी मंदिर येथून प्रारंभ झाल्यानंतर स्वागतयात्रा, कॉंग्रेसभवन, गोखले नाकामार्गे जयस्तंभ येथे येईल. येथे ही यात्रा आणि मारुती मंदिरपासून निघालेली स्वागतयात्रा एकत्र होऊन विराट संख्येने राम आळी मार्गे, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिरात पोहोचणार आहे. या मंदिरात हिंदु धर्माची शपथ घेऊन यात्रेची सांगता करण्यात येणार आहे.
बैठकीला श्री देव भैरी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र सुर्वे, उपाध्यक्ष राजन जोशी यांच्यासमवेत आनंद मराठे, सुधाकर सावंत, मुकुंद जोशी, एस. बी. खेडेकर, उमेश खंडकर, राजेश आयरे, कौस्तुभ सावंत, राजू जोशी, रवींद्र भोवड, गणेश भिंगार्डे, राकेश नलावडे, संजय जोशी, शहरातील विविध देवस्थानांचे अध्यक्ष, पदाधिकारी, पाटीदार समाज, जैन समाजासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.


चौकट १
१२१ मंडळांचे पदाधिकारी उपस्थित
आजच्या पहिल्या नियोजन बैठकीला १२१ मंडळ, संस्थांच्या प्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. सर्व मंडळांनी आपापला चित्ररथ किंवा जास्तीत जास्त पारंपरिक वेशभूषेत हिंदू बंधू-भगिनी सहभागी होतील, याची ग्वाही दिली. त्यामुळे यंदाची स्वागतयात्रा विराट होणार आहे. त्याकरिता विविध प्रकारचे नियोजन करण्यास आजपासून सुरवात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींनी मुंबई-कोलकाता महामार्ग रोखला, दोन महिन्याचे मानधन न मिळाल्याने आक्रमक पवित्रा

WPL 2026 : श्रेयांका पाटीलच्या ५ विकेट्स अन् RCB चा सलग तिसरा विजय; गुणतालिकेत Mumbai Indians ला बसला धक्का

Nagpur Municipal Election Result : महापालिकेत भाजपच ‘किंग’; चवथ्यांदा मिळविली सत्ता, काँग्रेसचे ‘मिशन १००’ फेल

भाजपच्या एबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून अर्ज भरला अन् विजय मिळवला; बंडखोराकडून महायुतीच्याच अधिकृत उमेदवाराला धोबीपछाड

Stock Market On Budget 2026 : बजेटच्या दिवशी रविवारी शेअर बाजार खुला राहणार का? NSE आणि BSE ने दिली मोठी अपडेट...

SCROLL FOR NEXT