rat२७२३.txt
बातमी क्र. २३ (टुडे पान ३ साठीमेन, ग्राफीक पद्धतीने घ्यावे.)
फोटो ओळी
-rat२७p१६.jpg-
८५५६८
राजापूर ः वणवा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणारे तरुण.
-rat२७p१७.jpg-
८५५६९
राजापूर ः वणव्यामध्ये होरपळून गेलेली बागेतील आंब्याची झाडे.
--
तीन वर्षात ९२ शेतकऱ्यांना वणव्याचा फटका
८४.६४ हेक्टरवरील आंबा, काजूचे नुकसान ; भरपाईही तुटपुंजी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ : शासनाने फलोत्पादन जिल्हा म्हणून घोषित केल्याचा फायदा घेत अनेक शेतकऱ्यांनी ओसाड वा पडीक जमिनीमध्ये आंबा, काजू, नारळ आदींची लागवड करून मोठ्या कष्टाने बागा फुलविल्या आहेत. मात्र उन्हाळ्यामध्ये सातत्याने विविध कारणांमुळे लागणाऱ्या वणव्यांमध्ये या बागा जळून शेतकरी, बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. गेल्या तीन वर्षात ९२ शेतकऱ्यांचे ८४.६४ हेक्टरवरील क्षेत्राचे आंबा, काजू पिकाचे नुकसान झाले आहे.
वणवे मानवनिर्मित आहेत की नैसर्गिक याचे अनेकवेळा कोडे सुटत नसले तरी, वणव्यांच्या दाहकतेमध्ये शेतकरी अन् बागायतदारांच्या स्वप्नांची राखरांगोळी होताना दिसत आहे. शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांनी पडीक जमिनी ओलिताखाली आणून त्यामध्ये आंबा, काजूच्या बागा विकसित केल्या आहेत. उन्हाळ्यामध्ये सातत्याने विविध कारणांमुळे लागणाऱ्या वणव्यांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने फुलविलेल्या बागा जळून खाक होत आहेत. विकसित केलेल्या या बागा लोकवस्तीपासून दूर असल्याने वणव्यांपासून संरक्षण करण्यामध्ये अडचणी येतात. काहीवेळा बागांमध्ये असलेल्या कामगार वा लोकांनाही वणवे रोखणे मुश्किल होवून जाते. अनेक बागांपर्यंत पोहचण्यासाठी व्यवस्थित रस्ते नसल्याने वणवा आटोक्यात आणण्यासाठई अग्नीशमन बंबही उपलब्ध होत नाही. त्यामुळे बागा जळून खाक होत आहेत. यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. नुकसानीचीही भरपाई देताना शासनाकडून हातही आखडले घेतले जात आहेत.
---
मग्रारोहयो योजनेंतर्गंत राजापुरात झालेली लागवड
वर्ष*लागवड झालेले क्षेत्र (हेक्टर)*लाभार्थी
२०१७-०१८*४३९.२*५६३
२०१८-०१९*२८५.९९*३६८
२०१९-०२०*३२५.१८*४०७
२०२०-०२१*२६७.०४*४२४
२०२१-०२२*१७७.१२*२७१
२०२२-०२३*२३८.२९*३०३
--
वणव्यामध्ये राजापुरातील बागांचे झालेले नुकसान
वर्ष*लाभार्थी संख्या*आंबा*काजू*एकूण क्षेत्र (हेक्टर)
२०१९-२०*३१*२१.८८*३.९९*२५.८७
२०२०-२१*५३*७.९०*१७.७३*२५.६३
२०२१-२२*८*३०.७८*५३.८६*३३.१४
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.