कोकण

संक्षिप्त-निरवडे येथे 9 पासून विविध धार्मिक कार्यक्रम

CD

निरवडे येथे ९ पासून विविध कार्यक्रम
सावंतवाडीः साटम महाराज कला, क्रीडा, सेवा मंडळाच्या वतीने निरवडे-झरबाजार येथे ९ ते ११ मार्च दरम्यानतुकाराम बीज तिथीला श्री सद्गुरू साटम महाराज यांचा ८६ वा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गुरुवारी (ता. ९) सकाळी ८ वाजता मूर्तिपूजन व पादुकापूजन, दुपारी १२ वाजता आरती, १२.३० वाजता तीर्थप्रसाद, १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ व आरती, रात्री ७ वाजता बुवा रुपेंद्र परब (वडखोल), बुवा सुंदर मेस्री (कसाल) आणि बुवा चिन्मय सावंत (कणकवली) या जिल्ह्यातील नामवंत भजनी बुवांचा जुगलबंदी कार्यक्रम, शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी ६ वाजता महिला मंडळ, निरवडे यांचा हरिपाठ व आरती, रात्री ८ वाजता सिंधुदुर्ग-गोवा मर्यादित खुली रेकॅार्ड डान्स स्पर्धा होणार आहे. यासाठी प्रथम ७०२३ रुपये व चषक, द्वितीय ५०२३ रुपये व चषक अशी बक्षिसे आहेत. शनिवारी (ता. ११) सायंकाळी ४ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, ६ वाजता हरिपाठ व आरती, रात्री ८ वाजता लिलाव, रात्री ९ वाजता नामवंत कलाकारांचा संयुक्त दशावतार ''वीर बब्रुवाहन'' हा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन साटम महाराज कला, क्रीडा, सेवा मंडळाने केले आहे.
...........
वेंगुर्लेत शनिवारी ‘दैवज्ञ चषक २०२३’
सावंतवाडीः सिंधुदुर्ग सुवर्णकार समाजातील युवक संघटितपणे एकत्र येण्यासाठी वेंगुर्ले-कँम्प येथील क्रीडांगणावर शनिवारी (ता. ४) ''दैवज्ञ चषक २०२३'' क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. विजेत्यास ११,००० रुपये, उपविजेत्यास ७,००० रुपये आणि चषक तसेच मालिकावीर, सामनावीर, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांनाही आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून दैवज्ञ समाजातील युवकांना संघटित करण्याचा प्रयत्न आहे. या स्पर्धेत दैवज्ञ समाजातील युवकांनी आपल्या संघांसह भाग घ्यावा. दैवज्ञ समाजबांधवांसह क्रिकेट रसिकांनी स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुर्लेचे अध्यक्ष दीपक मालवणकर, आयोजक भाऊ मालवणकर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT