कोकण

राजापूर-श्री सदस्यांनी जमवला 11 टन कचरा

CD

पान ५ साठी


८६१७६
श्री सदस्यांनी जमवला ११ टन कचरा
राजापुरात महास्वच्छता अभियान ; ग्रामपंचायतीचेही सहकार्य

राजापूर, ता. २ ः डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने तालुक्यातील श्री सदस्यांनी बुधवारी (ता. १) शहरामध्ये महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यामध्ये ९ टन सुका आणि २ टन ओला असा ११ टन कचरा गोळा करण्यात आला. या अभियानामुळे शहरातील रस्ते आणि परिसर स्वच्छ आणि सुंदर झाला.
बुधवारी महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने ठिकठिकाणी महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्याप्रमाणे येथील श्री सदस्यांनी शहरामध्ये स्वछता अभियान राबवले. यामध्ये सहभागी झालेल्या पाचशेहून अधिक श्री सदस्यांनी नगरपालिका हद्दीतील रस्ते आणि परिसराची स्वछता केली. त्याचवेळी शहरातील प्रमुख ठिकाणावरील कचरा उचलत परिसराची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकी जोपासली. या उपक्रमासाठी नगर पालिका प्रशासन, कोदवली ग्रामपंचायत यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले. सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जोपसणाऱ्या राबवलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
देवरुखातही अभियान
साडवली ः संगमेश्वर, साखरपा, देवरूख परिसरातील स्वयंसेवक, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त देवरूखमध्ये स्वच्छता अभियान राबवले. संगमेश्वर-देवरूख आणि साखरपा परिसरातून जवळपास १०० स्वयंसेवक या कामासाठी आले होते. बाजारपेठ, स्टेट बँक रोड, मारूती मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, मार्लेश्वर पेट्रोलपंप या मार्गावर स्वच्छता केली. देवरूख शहरातील प्रमुख विभागात श्री सदस्यांनी स्वच्छतामोहीम राबवून सेवा या शब्दाची महती पटवून दिली. शहरवासियांनी श्री सदस्यांचे कौतुक केले.
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT