कोकण

मर्जीतील व्यावसायिकांची आरक्षणे उठवली

CD

फोटो :kan94.jpg
87982
सिंधुदुर्गनगरी : येथील नगररचना संचालक विद्याधर देसाई यांची नगरपंचायत विरोधी पक्ष नगरसेवकांनी भेट घेतली.

मर्जीतील व्यावसायिकांची आरक्षणे उठवली
कणकवली नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा आरोप; सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे आराखडा खुला करण्यास दिरंगाई
कणकवली, ता. ९ : कणकवली नगरपंचायतीने आपल्‍या मर्जीतील व्यावसायिकांच्या जागांवरील आरक्षणे उठवली असल्‍याचा आरोप आज नगरपंचायतीच्या विरोधी पक्ष नगरसेवकांनी केला. तसेच सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्‍यामुळे कणकवली शहराचा सुधारीत विकास आराखडा अजूनही प्रसिद्ध केला जात नसल्‍याचीही टीका केली.
कणकवली शहर विकास आराखडा तातडीने खुला करावा या मागणीसाठी नगरपंचायतीचे विरोधी पक्षगटनेते सुशांत नाईक यांच्यासह नगरसेवक कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, माजी नगरसेवक उमेश वाळके यांच्यासह शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख सुजित जाधव, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर आदींनी आज ओरोस येथील नगररचना संचालक विद्याधर देसाई यांची भेट घेतली. यानंतर श्री.नाईक व इतर नगरसेवकांनी कणकवली शहर सुधारीत विकास आराखड्यावर टीका केली.
सुशांत नाईक म्‍हणाले, कणकवली शहराचा सुधारीत विकास आराखडा तयार झाला आहे. मात्र सत्ताधारी भाजप नेत्‍यांच्या दबावामुळे हा अहवाल अद्यापही खुला करण्यात आलेला नाही. तसेच शहरातील काही व्यावसायिकांच्या जागांवरील आरक्षणे उठविण्यात आली असल्‍याचा आमचा ठाम दावा आहे. याखेरीज अनेक जमिनींवरील ग्रीन झोन उठवून तेथे यलो झोन टाकण्यात आले आहेत. कणकवली नगरपंचायतमधील सत्ताधाऱ्यांनी कणकवलीकरांची फसवणूक केली आहे. त्‍यामुळे शहराचा विकास आराखडा तातडीने खुला करण्याची गरज आहे.
श्री. नाईक म्‍हणाले, कणकवली नगरपंचायतीची मुदत १३ एप्रिल रोजी संपणार आहे. ही मुदत संपल्‍यानंतर विकास आराखडा प्रसिद्ध करण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी अाखला होता. मात्र हा डाव आम्‍ही उधळला आहे. नगररचना संचालकांच्या आजच्या भेटीत शहर विकास आराखडा २४ मार्च रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे. तशी ग्‍वाही देखील नगररचना संचालकांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT