कोकण

वाघेरी कुळाचीवाडी रस्त्यासाठी १ कोटी ४६ लाख

CD

वाघेरी कुळाचीवाडी रस्त्यासाठी १ कोटी ४६ लाख
कणकवली,ता. १० ः वाघेरी कुळाचीवाडी (ता.कणकवली) रस्त्यासाठी मंजुरी देऊन प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी एकूण १ कोटी ४६ लाख ७० हजारचा निधी मंजूर करण्यात आला आहे. युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी ही माहिती दिली. खासदार विनायक राऊत, जिल्हासंपर्कप्रमुख अरूणभाई दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतिश सावंत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हा निधी मिळाला आहे. वाघेरी सरपंच अनुजा राणे, उपसरपंच स्नेहल नेवगे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम गुरव, तनुजा गुरव, निधी राणे, कविता कदम, श्रीकांत राणे, सिद्धेश राणे, प्रकाश वाघेरकर, मुरलीधर राणे, मंगेश नेवगे, बापू कदम, गजानन राणे यांच्यासह वाघेरी वाडीतील ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतिश सावंत यांच्याकडे वाघेरी वाडीकडे जाणारा उर्वरित रस्ता मंजूर करण्याची मागणी केली होती. आता या रस्त्याला मंजुरी मिळाली असून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय ८ मार्च रोजी निर्गमित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान राडा, उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Akola Municipal Election : भाजपच्या जागावाटपावर राष्ट्रवादी अजित पवार गटात अस्वस्थता? अमोल मिटकरींचं भाजपला थेट आव्हान...

Maharashtra Cold : राज्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज

Maharashtra Police Bharti 2025: राज्यातील पोलीस भरतीत प्रचंड चुरस! 15 हजारांहून अधिक जागांसाठी लाखो उमेदवार रिंगणात

प्रेयसीवर मोठ्या प्रमाणात उधळले पैसे, कर्जबाजारी झालेल्या प्रियकरानं कंबोडियात विकली किडनी, 'रॅकेट'मध्ये डाॅक्टरांचाही सहभाग!

SCROLL FOR NEXT