कोकण

नांदगावात बुधवारी व्हॉलीबॉल स्पर्धा

CD

नांदगावात बुधवारी व्हॉलीबॉल स्पर्धा

शिवसेना, मित्रमंडळाचा पुढाकार; राज्यातील नऊ संघांचा समावेश

नांदगाव, ता. ११ ः येथे राज्यस्तरीय निमंत्रित संघांची भव्य दिवस-रात्र शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा बुधवारी (ता. १५) फोंडा मार्गालगत सावंत मैदानात होणार आहे. नांदगाव युवा शूटिंग हॉलीबॉल मित्रमंडळ, नांदगाव आयोजित व शिवसेना नांदगाव, पुरस्कृत ही राज्यस्तरीय स्पर्धा होत असून स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे.
राज्यातील ९ बलाढ्य संघ सहभागी होणार असल्याने व्हॉलीबॉलप्रेमींना मोठी उत्सुकता लागली आहे. १५ मार्चला दुपारी तीनला उद्‍घाटन सोहळा होईल. स्पर्धेचे उद्‍घाटन सोसायटी माजी चेअरमन रवींद्र तेली, शिवसेना अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मज्जीद बटवाले, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, युवा नेते संदेश पारकर, शिवसेना नेते सतीश सावंत, युवासेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांची उपस्थिती असेल.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील बलाढ्य संघ एकमेकांना कडवी टक्कर देतील. सहभागी संघांमध्ये मुंबई महानगर पालिका, आयएससी मालेगाव, आझाद जामनेर, संजय भोसले प्रतिष्ठान, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, एसएम चिपळूण, कोल्हापूर जिल्हा, यूथ फेडरेशन मणेराजुरी यांच्यात विजेतेपदासाठी चुरस होणार आहे. प्रथम १५,००० रुपये व चषक, द्वितीय १०,००० रुपये व चषक, तृतीय ६००० रुपये चषक, चतुर्थ ६,००० रुपये व भव्य चषक तसेच पाच ते आठपर्यंतच्या संघांना प्रत्येकी २००० रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. क्रीडारसिकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आसिफ बटवाले, आलिम बटवाले, मज्जीद बटवाले, ईमाम नावलेकर यांनी नांदगाव युवा शूटिंग व्हॉलीबॉल मित्रमंडळाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT