rat१३३२.txt
फोटो ओळी
-rat१३p३१.jpg-
८८८३३
वेळंब ः माळी यांच्या शेतातील ७.३० किलोच्या हळदीच्या गड्ड्याची पाहणी करताना सरपंच, पोलिस पाटील आणि कृषी अधिकारी.
--
माळींच्या शेतात साडेसात किलोचा हळदीचा गड्डा
एसके ४ वाणाची लागवड ; सेंद्रिय खताची मात्रा
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १३ ः सेंद्रिय शेती करणारे प्रयोगशील शेतकरी विजय माळींनी वेळंबमध्ये एसके ४ हळदीच्या वाणाची लागवड केली होती. सेंद्रिय खतांबरोबरच जीवामृत दिल्याने त्यांच्या शेतात ७.३० किलोचा हळदीचा गड्डा तयार झाला. हळदीच्या एका कांद्यापासून आजपर्यंत केवळ ५ किलो गड्डा मिळाल्याची नोंद आहे. त्यामुळे विजय माळींच्या ७.३० किलो हळदीच्या गड्ड्याने नवा विक्रम केला आहे.
गुहागर तालुक्यातील वातावरण व जमीन हळदीच्या उत्पादनासाठी पोषक आहे. त्यामुळे हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढावी म्हणून पंचायत समिती गुहागरतर्फे हळद लागवडीची स्पर्धाही घेण्यात आली आहे. सर्वात मोठा गड्डा उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्याला प्रथम क्रमाकांसाठी अडीच हजार, द्वितीय क्रमांकासाठी दीड हजार आणि तृतीय क्रमाकांसाठी एक हजार रुपये असे रोख बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
माळी हे कष्टाळू शेतकरी असून आपल्या शेतात भाजीपाला, कडधान्य लागवड करून तसेच छोट्या नारळ सुपारीच्या बागेवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सेंद्रिय शेती हा त्यांच्या आवडीचा विषय असून त्यातील अधिक अभ्यासासाठी कृषी विभागाच्या विविध प्रशिक्षणांमध्ये सहभागी होतात. यातून मिळालेल्या माहितीचा उपयोग करून ते आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करतात. या स्पर्धेत भाग घेत प्रथमच माळी यांनी एसके ४ हळदीच्या वाणाची लागवड केली. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या माळी यांनी इथेही प्रयोग केला. कुजलेले शेणखत, बायोगॅस संयंत्रापासूनचे सेंद्रिय खत यांच्या जोडीला जीवामृताची मात्रा हळदीला दिली. ट्रायकोडर्मा व्हिरिडी या जैविक बुरशीचा वापर केला. या सर्वांचा परिणाम म्हणून त्यांच्या शेतातील हळद चांगली पोसली गेली. एक कांदा रूजवल्यावर त्याला अनेक ठिकाणाहून हळदीची रोपे आली. स्वाभाविकपणे हळदीचे उत्पादन वाढले. हळद खणताना ७.३० किलोचा गड्डा मिळाल्यावर तातडीने त्यांनी पंचायत समिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
हळदीचा मोठा गड्डा तपासण्यासाठी आणि उत्पादन पाहण्यासाठी वेळंब ग्रामपंचायतीच्या सरपंच समिक्षा बारगोडे, स्पेशल कोकण -४वाणाचे प्रणेते सचिन कारेकर, कृषी अधिकारी आर. के. धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद राणे, पोलिस पाटील स्वप्नील बारगोडे यांच्या उपस्थितीत या गड्ड्याचे वजन करण्यात आले. त्या वेळी हा गड्डा ७.३० किलोचा असल्याचे समोर आहे. आजपर्यंत इतका मोठा हळदीचा गड्डा कधीच पाहिला नव्हता, अशी टिप्पणी करत मंडणगडमध्ये यापूर्वी ५ किलो हळदीचा गड्डा सापडल्याचे गजेंद्र पौनीकर यांनी सांगितले.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.