कोकण

रत्नागिरी- आज रत्नागिरीत दुचाकी, सायकल फेरी

CD

rat१८p९.jpg-
८९८३९
रत्नागिरी ः हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या नियोजन बैठकीला डावीकडून उपस्थित संतोष पावरी, नाचणकर, आनंद मराठे, केशव भट, राकेश नलावडे, सचिन वहाळकर, कोमल सिंह आणि कौस्तुभ सावंत.
----------
रत्नागिरीत आज दुचाकी, सायकल फेरी
नववर्ष स्वागतयात्रा; २२ चित्ररथांचा सहभाग
रत्नागिरी, ता. १८ः हिंदू नववर्ष स्वागतयात्रेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील विवा एक्झिक्युटिव्ह येथे काल सायंकाळी हिंदुत्ववादी संघटनांची सभा झाली. मारूती मंदिर परिसर येथून नववर्ष स्वागतयात्रेत २२ चित्ररथ सहभागी होणार असून, सुमारे ३ हजारांहून अधिक हिंदू बंधू-भगिनी यात्रेत पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेणार आहेत.
दरवर्षी ग्रामदैवत भैरी मंदिर ते समाजमंदिर पतितपावन मंदिरापर्यंत स्वागतयात्रा काढण्यात येते. शहराच्या वरील भागातून हजारो हिंदू या यात्रेत सहभागी होत असून, २०१५ पासून मारूती मंदिर भागातून चित्ररथ येऊन ते जयस्तंभ येथे मुख्य स्वागतयात्रेत सामील होत असतात. हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे हे १९ वे वर्ष आहे. प्रतिवर्षाप्रमाणे हिंदू परंपरेप्रमाणे विविध चित्ररथ यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
या स्वागतयात्रेच्या प्रचाराकरिता रविवारी (ता. १९) सायंकाळी ५ वाजता दुचाकी व सायकलफेरी काढण्यात येणार आहे. ही फेरी पतिपावन मंदिर, शेरेनाका, काँग्रेस भुवन, साळवी स्टॉप, छत्रपती नगर, परत पतितपावन मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य सायकल फेरीत सहभागी होणार आहेत तसेच स्वागतयात्रेमध्ये सायकलिस्ट क्लबतर्फे सायकलिंगचा प्रचार करणारा रथ ठेवण्यात येणार आहे. फेरीत प्रत्येकाला झेंडे देण्यात येणार आहेत. या यात्रेच्या संदर्भातील माहितीपत्रके अद्वैत पेट्रोलपंप, गुरूकृपा मंगल कार्यालय, पतितपावन मंदिर या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. जास्तीत जास्त हिंदू बांधवांचा सहभाग वाढावा याकरिता प्रयत्न व्हावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या नागरिकांना स्वेच्छेने काही आर्थिक मदत करावयाची असल्यास केशव भट यांच्याकडे सुपूर्द करण्यात यावी. या यात्रेदरम्यान विविध शौर्य खेळदेखील असणार आहेत. विविध देखावे आहेत. यात्रेत जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीवेळी आनंद मराठे, संतोष पावरी, कोमल सिंह, कौस्तुभ सावंत, राकेश नलावडे, सचिन वहाळकर, केशव भट, रूपेश पेडणेकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT