कोकण

हर्बल द्रव्ययुक्त सॅनिटरी पॅड पकल्पाचे उद्घाटन

CD

rat२०१९.txt

-rat२०p४.jpg-
९०२३६
रत्नागिरी : उद्घाटनप्रसंगी उद्योजिका रश्मी प्रभुदेसाई, बँक ऑफ इंडियाच्या चांदेराई शाखेच्या व्यवस्थापक प्रतिमा जाधव, डॉ. श्रृती ठाकूर, प्रतिभा प्रभुदेसाई, अॅड. अकल्पिता चक्रदेव, जान्हवी भुरवणे आदी.
-
हर्बल द्रव्ययुक्त सॅनिटरी पॅड प्रकल्पाचे उद्घाटन

हरचिरीत केंद्र ; पर्यावरणस्नेही उत्पादन

रत्नागिरी, ता. २० : मानवी जीवनात वाढलेला रसायनांचा वापर आणि पर्यावरण संतुलन हा मुद्दा अलिकडे अधिकाधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्णपणे हर्बल द्रव्ये वापरून तयार केलेल्या सॅनिटरी नॅपकीनचे उत्पादन केंद्र तालुक्यातील हरचिरी येथे सुरू झाले. विशेष बाब म्हणजे ही पॅड्स विघटनाद्वारे पर्यावरणात मिसळून जाणारी आहेत.
बँक ऑफ इंडियाच्या चांदेराई शाखेच्या व्यवस्थापक प्रतिमा जाधव यांच्याहस्ते या उपकमाचे उद्घाटन करण्यात आले. हा उपक्रम हरचिरी गावच्या रहिवासी रश्मी प्रभुदेसाई यांनी सुरू केला आहे. उद्घाटन कार्यकमाला डॉ. श्रृती ठाकूर, डॉ. शरद प्रभुदेसाई, प्रतिभा प्रभुदेसाई, अॅड. अकल्पिता चक्रदेव, रोहित भुरवणे, उद्योजिका जान्हवी भुरवणे, नर्सरी उद्योजक विनोद प्रभुदेसाई आदी उपस्थित होते.
उद्योजिका रश्मी प्रभुदेसाई यांनी सांगितले की, विविध रसायनांच्या वापरामुळे अनेक महिलांवर पॅड्सच्या वापराचे दुष्परिणाम दिसून येतात. यासाठी हर्बल द्रव्य वापरून सॅनिटरी पॅडस् तयार करण्याचा मुद्दा माझ्या डोळ्यासमोर अनेक वर्ष होता. आता तो साकारत आहे. हे पॅडस् विघटनशील असून पर्यावरणात ते सहजपणे सामावले जाऊ शकतात. ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना वापरण्यासाठी उपयुक्त ठरतील असे त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT