कोकण

लाचलुचपत कारवाई

CD

90615

पोलिस उपनिरीक्षक
लाचलुचपतच्या जाळ्यात
विश्रामबाग पोलिसांत गुन्हा; ४० हजारांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. २१ ः गुन्ह्यामध्ये अटक न करता नोटीस देऊन सोडण्याच्या मोबदल्यात ४० हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अकबर खताळसो हवालदार (वय ५३, रा. वर्धमान इमरड अपार्टमेंट, अल्फान्सो स्कूलजवळ, मिरज) असे संशयित अधिकाऱ्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, तक्रारदाराचा भाऊ व इतर दोघांविरोधात विश्रामबाग पोलिसांत गुन्हा नोंद आहे. गुन्ह्यात तक्रारदाराच्या भावास अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी तसेच तपासात मदत करण्यासाठी उपनिरीक्षक अकबर हवालदार याने सुरुवातीला ६० हजार रुपयांची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
जानेवारी व फेब्रुवारीत या तक्रारीची पडताळणी केली. यात तक्रारदाराच्या भावास अटक न करता नोटीस देण्यासाठी ६० हजार रुपये लाचेची मागणी करून चर्चेअंती ५० हजार व त्यानंतर ४० हजार रुपयांवर तडजोड झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार हवालदार याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, धनंजय खाडे, प्रतिम चौगुले, रवींद्र धुमाळ, सलीम मकानदार, अजित पाटील, चंद्रकांत जाधव, ऋषिकेश बडणीकर, रामहरी वाघमोडे, सीमा माने आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT