कोकण

बिलीमारो... आणि भूमिका

CD

प्रवास दशावताराचा

swt2315.jpg
90907
पंचारतीत पैसे स्वीकारणारा बिलीमारो.
swt2316.jpg
90908
वैभव खानोलकर

बिलीमारो... आणि भूमिका

लीड
महाराष्ट्र हे विविध सांस्कृतिक परंपरांनी समृद्ध असणारे राज्य आहे. अठरापगड जाती असणाऱ्या महाराष्ट्राला अनेक समृद्ध लोककलांचा वारसा लाभला असून त्यात कोकणची लोककला म्हणून आजही दशावताराकडे अभिमानाने पाहिले जाते.
कोकणच्या लाल मातीत जन्माला आलेले आणि अनेक सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक स्थित्यंतरे होऊनही आपला बाज आणि ठेवण तशीच राखत आजही शासन दरबारी उपेक्षित असूनही अनेकांचा ध्यास, कधी श्वास बनताना नवीन ओळख बनविणारी, सामान्य लोकांनी जतन आणि संवर्धन केलेली लोककला म्हणून आजही श्रध्देने दशावताराकडे पाहिले जाते.
- प्रा. वैभव खानोलकर
..............
श्रध्दा आली की भाव येतो आणि भाव आला म्हणजे देव असतोच! अगदी तोच भाव आपल्याला या लोककलावंतांसोबत बघायला मिळतो, तो या देवभोळ्या रसिकात.
नवरात्र सुरू झाली की वेध लागतात ते धयकाल्याचे आणि मग गावोगावी धयकाले तिथीनुसार पार पाडले जातात.
जनसागर उसळतो, वातावरण वाद्यांच्या नादाने मंगलमय होते आणि रात्री मृदंगावर थाप पडते, झांज ठेका धरते आणि काही झोपलेले रसिक डोळे चोळत जागे होतात. रंगमंचावर विविध पात्रे आपल्या कलाविष्काराने रसिकमनांचा वेध घेतात. अशावेळी गर्दीतून वाट काढत महिला भगिनींना सांभाळत एक पंचारती घेऊन रसिकांकडून स्वखुशीने पंचारतीत पैसे स्वीकारणारी एक स्त्री नजरेस पडते; पण ही स्त्री खरी नसून एका पुरुषाने साकारलेली स्त्रीची व्यक्तिरेखा असते.
दशावतारात या व्यक्तिरेखेला बिलीमारो, तळीवाला म्हणून ही ओळखले जाते. इतर कलावंतांच्या तुलनेत अल्प मानधनावर काम करणाऱ्या तळीवाल्याला दशावतारी भाषेत गडी म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. इतर गडी करतात ती कामे करून दशावतार लोककलेच्या मंडळाची चालता-बोलता जाहिरात करणारे ते महत्त्वाचे आणि प्रभावी जाहिरात केंद्र असते.
रंगमंचावर काय चाललंय आणि रसिकांना नेमकं काय हवं, याची इत्थंभूत माहिती तो आपला नाट्यमंडळाच्या मालक वा संचालकांना देत असतो. लोककलेचा व नाट्यमंडळाचा एक निष्ठावंत सेवक म्हणून त्याचे मंडळात स्थान असते. बहुतेक वेळा अगदी नाट्यमंडळाच्या मालकाशेजारीच या बिलीमारो साकारणाऱ्या लोककलावंताची बॅग लावलेली आपल्याला दिसते.
''बिलीमारो'' या शब्दाचा अर्थ ''पैसा मागणारा'' असा असून काही ठिकाणी या शब्दाचा अर्थ तोंडावर जास्त अभ्रक वा चमकणारी झिगी किंवा चमकी मारून रसिकांचे लक्ष वेधून घेणारा; पण रंगमंचाबाहेरील स्त्री कलावंत, असाही घेतला जातो.
खरंतर लोककलेतील बिलीमारो या शब्दाला अर्थात बांधण्यापेक्षा त्याला कर्तव्यात बांधल्यास तो अधिक व्यापक दिसतो.
धयकाल्याची सुरुवात देवाची पालखी आदी धार्मिक कार्ये आटोपल्यावर होते. त्यामुळे सर्व दशावतार कलावंत झोपी जातात; पण बिलीमारो होणारा कलावंत इतर सहकलाकवंतांना जागृत करण्याची जबाबदारी पार पाडतो. त्यामुळे सगळ्यांना जेवण दिल्यानंतर सगळे आवरून त्याला झोपावे लागते. म्हणजे एक कलावंत म्हणून सगळ्या कलाकारांनंतर झोपी गेलेला तळीवाला सगळ्यात पहिला उठतो आणि वेशभूषा करण्यासाठी बसतो.
हे सगळे परंपरेने चालत आलेले अलिखित नियम असतात आणि ते आजही तसेच पाळले जातात. महागणपतीसोबत रिद्धी सिद्धी ही भूमिका हाच तळीवाला पार पाडतो. तर आड दशावतारात महाविष्णूही बहुतेक वेळा हाच कलावंत साकारतो. म्हणजे एका नाटकात बिलीमारो, रिद्धी सिद्धी, महाविष्णू, तळीवाला आणि मंडळाचा गडी अशा विविधांगी भूमिका करणारा बिलीमारो आपल्याला सतत शिकवतो, ती देण्याची वृत्ती. त्यांच्या पंचारतीसमोर लोक नतमस्तक होतत व भक्तिभावाने पैसे टाकताना दिसतात. तो ते आनंदाने स्वीकारताना दिसतो. जणू या जगात फुकट काहीच बघायचे नसते, ना घ्यायचे असते, असा साक्षात्कार घडवणाऱ्या दशावतार लोककलेत कृतज्ञता ही महत्त्वाची असते.
चापूनचोपून नेसलेली साडी, तितकाच आकर्षक मेकअप, अप्सरेला लाजवेल असा थाट आणि रसिकांच्या गर्दीतून अलगद वाट काढत माता-भगिनींना सन्मानपूर्वक वागणूक देत आपल्या नाट्यमंडळाच्या नावाची छाप जनमानसावर उमटविणारा बिलीमारो म्हणजे दशावतारी नाटकात स्त्री व्यक्तिरेखा साकारण्याआधी केलेली स्त्री अभिनयाची रंगीत तालीम होय. आज दशावताराच्या
इतिहासात डोकावता काही दिग्गज कलाकारांनी आपल्या भूमिकेचा श्री गणेशा याच बिलीमारो भूमिकेतुन करत मोठी उंची गाठल्याचे दिसून येते. दशावतार लोककलेत भूमिका तर सगळ्याच महत्त्वाच्या असतात, फक्त कलावंत म्हणून आपण त्या कशा सादर करतो, यावरून आपले मूल्यांकन होते. अशा या दशावतार लोककलेत अनिवार्य आणि महत्त्वाचे स्थान असणारा बिलीमारो अनुभवायचा असेल, तर नक्की भेट द्या दशावतार मंडळांना!
...............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT