कोकण

सिंधुदुर्गात मत्स्य व्यवसायाला मिळणार चालना

CD

सिंधुदुर्गात मत्स्य व्यवसायाला मिळणार चालना

अर्थसंकल्पात तरतूद; कोकणासाठी साडेतेरा हजार कोटी

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २४ ः नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात कोकण विकासासाठी जवळपास साडेतेरा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातून कोकणातील नारळ, सुपारी, मिरी, काजू, फणस, आंबा या फळपिकांबरोबरच प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणार आहे. शिवाय मत्स्य व्यवसायवृद्धीसाठी मोठा फायदा मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायवाढीस अधिक चालना मिळणार आहे.
जिल्ह्याला १२१ किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. यावरील ८७ गावांमधून मासेमारी चालते. २०१६ नुसार ३२ हजार १७ ही मच्छीमारांची लोकसंख्या आहे. एकूण ७ हजार ३०४ कुटुंबे असून त्यापैकी ७ हजार १७४ क्रियाशील मच्छीमार आहेत. जिल्ह्यात मासळी उतरविण्याची ३४ केंद्रे आहेत. तर शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र दांडी-मालवण येथे आहे. एकूण २३ बर्फ कारखाने असून तीन शीतगृहे आहेत. एकूण परवानाधारक मासेमारी नौका २ हजार ८२६ आहेत. १ हजार ६४६ परवानाधारक यांत्रिक नौका आहेत. तर परवानाधारक, बिगर परवानाधारक नौका १ हजार १८० इतक्या आहेत. २३ सागरी मत्स्य सहकारी संस्था असून २६ हजार ७७२ मत्स्य सहकारी संस्थांचे सभासद आहेत.
जिल्ह्यात ३८० डिस्ट्रेस अलर्ट ट्रान्समिशन यंत्र असून २१ व्हिटीएस-एआयएस यंत्र आहेत. ३१२ नौकाधारकांना किसान क्रेडीट कार्ड देण्यात आले आहे. निमखारे पाणी खाजणक्षेत्र २ हजार २१६ हेक्टर असून संवर्धनास उपयुक्त क्षेत्र १ हजार २६८ हेक्टर इतके आहे. तटीय जलकृषी प्राधिकरण अंतर्गत ५५ नोंदणीकृत तलाव असून त्यापैकी २८ सुरू आहेत. मासेमारी हक्क असणारे पाटबंधारे तलाव २८ आहेत. ठेक्याने दिलेले तलाव २५ आहेत. गोड्या पाण्यातील मत्स्य सहकारी संस्था सहा आहेत. २०१९-२० मध्ये मत्स्य उत्पादन १७ हजार ३११ मेट्रीक टन इतके झाले आहे.
--
शेती- मत्स्य निर्यातीची संधीही
९ मार्चला झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात कोकणात विकासाला चालना देण्यासाठी जवळपास साडेतेरा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कोकणातील नारळ, सुपारी, मिरी, काजू, फणस, आंबा या फळपिकांबरोबरच प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणार आहेच, शिवाय मत्स्य व्यवसायवृद्धीसाठी मोठा फायदा मिळणार आहे. मोपा हे आंतरराष्ट्रीय आणि बॅ. नाथ पै अशा दोन विमानतळांमुळे पर्यटन जिल्ह्यातील पर्यटनवाढीसह येथील शेती-मत्स्य उत्पादनाची निर्यात होण्यासही भविष्यात मोठी संधी आहे. त्यामुळे निश्चितच छोट्या-मोठ्या रोजगारांबरोबरच उद्योग-व्यवसायांची देखील वाढ होणार आहे.
...............
कोट
अर्थसंकल्पातील तरतुदीचा हा बूस्टर डोस जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला लाभदायक ठरणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प राज्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून फायदेशीर आहेच, विशेषत: कोकणाच्या विकासाला गतिमान करणारा ठरणार आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाला चालना देणारा, सुविधा उपलब्ध करून देणारा ठरेल.
- दाजी सावजी, मालवण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT