कोकण

चिपळूण-कात्रोळी वस्तीची एसटी फेरी पुन्हा सुरू करावी

CD

चिपळूण-कात्रोळी वस्तीची एसटी सुरू करावी

चिपळूण, ता. २४ ः कोरोना काळात चिपळूण आगारातून बंद करण्यात आलेली चिपळूण-कात्रोळी वस्तीची एसटी बसफेरी रामपूर देवखेरकी, ओमळीफाटा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी कोकण प्रवासी महासंघाचे कार्याध्यक्ष व ग्रामीण संघटनेचे महासचिव वसंत भोसले यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी विभाग नियंत्रक यांच्याकडे केली आहे.
वसंत भोसले व संघटनेचे सदस्य दत्ताराम जाधव यांनी नुकतीच रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. चिपळूण-कात्रोळी वस्तीच्या बस फेरीबरोबरच गेले तीन वर्षे प्रवाशांची मागणी असलेली दुपारी १२ वा. सुटणारी चिपळूण-रामपूर कात्रोळीमार्गे गोंधळे भोसलेवाडी शाळा ही फेरीसुद्धा सुरू करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. चर्चेअंती चिपळूण ते कात्रोळी वस्तीची गाडी व देवखेरकी, ओमळीफाटा या फेऱ्या लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी भोसले यांना दिले. गुहागर-रत्नागिरी या गाडीवर येणारा प्रवासी लोड कमी करण्यासाठी गणेशखिंड ते सावर्डेदरम्यान शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर व्हावा व डेरवण हॉस्पिटल येथे ये-जा करणाऱ्या रुग्णांना, त्यांच्या नातेवाइकांना थेट गाडी मिळावी यासाठी गुहागर ते डेरवण हॉस्पिटल अशी सकाळी ९ वा. गुहागर आगारातून बसफेरी सुरू करावी, अशी मागणीही करण्यात आली. या मागणीबाबतही अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली. रत्नागिरीतील विभाग नियंत्रक कार्यालयातील वाहतूक विभागाचे अधिकारी जाधव यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्‍वासित करत आपल्या मागण्यांचा नक्कीच विचार केला जाईल, अशी ग्वाही दिली. त्यांच्याकडून चिपळूण-गोंधळे ही गाडी जुलै महिन्यामध्ये सुरू करण्याचे आश्‍वासन देण्यात आले, अशी माहिती कोकण प्रवासी महासंघाचे कार्याध्यक्ष व ग्रामीण कार्यकारिणीचे महासचिव वसंत भोसले, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप चव्हाण, सदस्य दत्ताराम जाधव यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT