कोकण

अपघातग्रस्त विद्यार्थ्यास शिक्षक समितीकडून मदत

CD

91447
नडगिवे नं. १ ः यश नार्वेकर याला मदत सुपूर्द करताना शिक्षक समितीचे पदाधिकारी.

अपघातग्रस्त विद्यार्थ्यास
शिक्षक समितीकडून मदत
तळेरे ः शाळा नडगिवे नं. १ येथे सहावीत शिकणारा विद्यार्थी यश नार्वेकर हा शाळेत खेळताना पडल्याने जखमी झाला. या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने शिक्षक समिती, कणकवली यांच्यावतीने त्याला तीन हजार रुपयांची आर्थिक मदत त्याच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आली. या खारेपाटण केंद्रातील शिक्षक समितीचे पदाधिकारी मंगेश मुद्रस, अमोल तुपविहिरे, राजेश तेरवणकर, इरफान सारंग, सुप्रिया शेट्ये, नडगिवे शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटकर आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. या मदतीबाबत नार्वेकर कुटुंबीयांनी शिक्षक समितीचे आभार मानले.
..................
‘महाविकास’चे आज कुडाळात आंदोलन
कुडाळ ः मोदी सरकारने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून लोकशाहीचा अंत केला आहे, असा आरोप करीत याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने उद्या (ता. २७) येथील गांधीचौकात सकाळी अकराला आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, सतीश सावंत, संदेश पारकर, आमदार वैभव नाईक, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, विकास सावंत आदी उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT