कोकण

राजापूर-राज्यस्तरीय स्पर्धेत मराठे महाविद्यालय यशस्वी

CD

rat२८१९.txt

बातमी क्र..१९ (टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat२८p१२.jpg ः

91880
राजापूर ः ‘इकोफेस्ट २०२३’ या राज्यस्तरीय स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत प्रभारी प्राचार्य डॉ. जी. डी. हराळे आणि प्राध्यापकवृंद आदी.
----------

मराठे महाविद्यालयाचे ‘इकोफेस्ट’मध्ये यश

सातारच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये राज्यस्तरीय स्पर्धा

राजापूर, ता. २८ ः सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागातर्फे आयोजित केलेल्या ‘इकोफेस्ट २०२३’ या राज्यस्तरीय स्पर्धेत तालुक्यातील आबासाहेब मराठे महाविद्यालयाने नेत्रदीपक यश मिळवले. ‘इकोफेस्ट २०२३’अंतर्गत राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा आणि राष्ट्रीय संशोधन स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये आबासाहेब मराठे महाविद्यालयाच्या संघाने तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.
महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी दीपाली करंजवकर आणि पूर्वा बाकाळकर यांच्या संघाने ‘रशिया- युक्रेन युद्धाचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम’ या विषयावर, तर ईशा शेलार आणि गौरी डोंगरकर यांच्या संघाने ‘लिपस्टिक परिणाम व भारतीय अर्थव्यवस्था’ या विषयावर रांगोळी कलेचे प्रदर्शन केले. राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत बाकाळकर यांनी ‘दी प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या पुस्तकाच्या समीक्षेसाठी द्वितीय क्रमांक पटकावला. अर्थशास्त्र विभागाचे प्रा. गौरव पवार यांच्या ‘रिसर्च केस स्टडी’ने द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेसाठी प्रभारी प्राचार्य डॉ. जी. डी. हराळे, अर्थशास्त्र विभागप्रमुख नबिला सोलकर, प्रा. गीतांजली हाके, प्रा. कविता आमकर, प्रा. गौरव पवार यांचे मार्गदर्शन लाभले. प्रभारी प्राचार्य डॉ. हराळे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदींनी सर्वांचे भिनंदन केले.
....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT