कोकण

वायंगणतड येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

CD

96679
प्रथमेश सावंत

वायंगणतड येथील तरुणाची
गळफास घेऊन आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १७ ः वायंगणतड येथील तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. प्रथमेश वसंत सावंत (वय २९) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडली. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.
प्रथमेश हा गोव्यात कामाला होता. वायंगणतड येथे राहत्या घरात त्याने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबतची माहिती येथील पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक जयेश ठाकूर व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा त्यांनी रीतसर पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला; मात्र, आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक अधिकारी यांनी सांगितले. प्रथमेश हा घरचा एकटाच कमवता होता. कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. या घटनेने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT