कोकण

आंबोलीत 18 ट्रक पकडले

CD

swt२१२०.jpg
९७६५४
आंबोलीः येथे अवजड वाहतूकप्रकरणी पकडण्यात आलेले ट्रक.

आंबोलीत १८ ट्रक पकडले
अवजड वाहतूकः महसूल, आरटीओसह पोलिसांकडून कारवाई
सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. २१ः येथील घाटातून होणाऱ्या अवजडवाहतुकीविरोधात मनसेने आवाज उठविल्यानंतर महसूल विभाग, आरटीओ आणि येथील पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. अवजड वाहतूकप्रकरणी तब्बल १८ ट्रक पकडण्यात आले.
त्यातील दोन ट्रक रिकामी मिळाले असून १६ गाड्यांवर ५ लाख ३६ हजार रुपये दंडात्मक कारवाई आरटीओ विजयकुमार अल्लामवार यांनी केली. महसूल विभाग, तहसीलदार यांनी किती दंड ठोठावल्याची माहिती मिळाली नसल्याचे येथील पोलीस हवालदार दत्ता देसाई यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने आंबोली घाट मार्ग हा अवजड वाहनांसाठी बंद करण्याचे स्पष्ट निर्देश देऊन देखील या घाटमार्गावरून रात्रीच्या वेळेस परजिल्ह्यात ओव्हरलोड चिरे वाहतूक करणारे ट्रक दैनंदिन घाटमार्गे जात असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून व व्यावसायिकांकडून केल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.१९) आंबोली चेक पोस्टवर धडक देत परजिल्ह्यातील अवजड वाहतूक करणाऱ्या मल्टी एक्सल ट्रेलर्सवर कारवाई करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर काल महसूल विभाग आणि आरटीओ आणि पोलिसांनी कारवाई केली. यावेळी अवजड वाहतूकप्रकरणी तब्बल १८ ट्रक पकडण्यात आले. त्यातील दोन ट्रक रिकामी मिळाले. आरटीओ अल्लमवार, सहाय्यक निरीक्षक अमित पाटील ही कारवाई केली. त्यापैकी १६ गाड्यांवर ५ लाख ३६ हजारचा दंड केला आहे. सहाय्यक निरीक्षक तौसिफ सैय्यद, सहाय्यक उपनिरीक्षक प्रफुल मातोंडकर, हवालदार दत्ता देसाई, अभिजित कांबळे, दीपक शिंदे यांनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT