कोकण

संगम प्रभागसंघाचे काम आदर्शवत

CD

99298
नेरुर ः उमेद अंतर्गत संगम प्रभागसंघ देऊळवाडा यांच्यावतीने ग्रामसंघ, पदाधिकारी व लेखापालांचा सत्कार करण्यात आला. (छायाचित्र ः अजय सावंत)

संगम प्रभागसंघाचे काम आदर्शवत

विजय चव्हाण; नेरुरमध्ये वार्षिक मेळाव्याचा समारोप

कुडाळ, ता. २९ ः जिल्ह्यात संगम प्रभागसंघ नेरूरचे कार्य कौतुकास्पद आहे. भविष्यात अशाच प्रकारे आदर्शवत काम करा. प्रशासनाच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य राहील, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी प्रभागाच्या वार्षिक समारोप मेळाव्यात केले. यावेळी या प्रभागातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या १५ ग्रामसंघांसह पदाधिकारी व लेखापालांचा सत्कार झाला.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत संगम प्रभागसंघ नेरुर-देऊळवाडा यांच्यातर्फे संगम प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा व इतर विविध कार्यक्रम सुखकर्ता हॉल, नेरुर-चव्हाटा येथे झाले. आमदार नाईक यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, सरपंच भक्ती घाडीगावकर, माजी सरपंच शेखर गावडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार, तालुका अभियान व्यवस्थापक गणेश राठोड, भास्कर गावडे, श्री. कदम, प्रभागसंघ अध्यक्ष सोनाली चव्हाण, प्रभागसंघ सचिव स्वरा नेरुरकर, कोषाध्यक्ष पुष्पलता म्हाडदळकर, माजी अध्यक्ष शामल प्रभू, अनन्या हडकर, रुपेश पावसकर, ग्रामसेवक सतीश साळगावकर, नेरुर ग्रामपंचायत सदस्य निकिती सडवेलकर, पूजा लिंगे, अनुजा नेरुरकर, रोशनी नाईक, रुचा पावसकर, सुचित्रा नेरुरकर, मंजुनाथ फडके, कवठी सरपंच-स्वाती करलकर, विजयश्री मेस्त्री, उषा नेरुरकर, नितीन जावळे, रसिका राणे, प्रभागबंध समन्वयक प्राजक्ता नाईक-केरकर, सुप्रिया वालावलकर, रचना नेरुरकर, लक्ष्मी सडवेलकर, मधुश्री नाईक, दीपश्री नेरुरकर आदी उपस्थित होते.
दिवसभर झालेल्या कार्यक्रमात ग्रामसंघ व सीआरपी यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये उत्कृष्ट समूह-कृष्णाई स्वयंसहायता (नेरुर), नवदुर्गा स्वयंसहायता (चेंदवण), उत्कृष्ट उत्पादक गट-नवदुर्गा उत्पादक गट हुमरमळा यांचा गौरव करण्यात आला. ग्रामसंघ सत्कारामध्ये जनसेवा ग्रामसंघ (नेरुर), नारीशक्ती ग्रामसंघ मानकादेवी (नेरुर), उत्कर्ष ग्रामसंघ नेरुर- कविलगाव, समृद्धी ग्रामसंघ (नेरुर), संजीवनी ग्रामसंघ (नेरुर), आदर्श ग्रामसंघ (नेरुर), क्रांती ग्रामसंघ (सरंबळ), संकल्प ग्रामसंघ (सरंबळ), स्वामीनी ग्रामसंघ (सरंबळ), लक्ष्मीनारायण ग्रामसंघ (वालावल), सखी ग्रामसंघ (हुमरमळा), समृद्धी ग्रामसंघ (चेंदवण), राजेशाही ग्रामसंघ (चेंदवण), स्त्रीशक्ती ग्रामसंघ (चेंदवण), घे भरारी ग्रामसंघ (कवठी) यांचा समावेश होता. सीआरपी सत्कारमध्ये मानसी नेरुरकर, नेहा गावडे, प्रेषिला फर्नाडिस, उषा नेरुरकर कामिनी नाईक, धनश्री सारंग, रसिका पारकर, शुभांगी चव्हाण, नयना सुतार, वनिता गोसावी, स्वामींनी ग्रामसंघ गीतांजली, मानसी वालावलकर, हिताली गुंजकर, साक्षी नाईक, रेवती तोरसकर, सानवी चेंदवणकर, दीपाली गोडकर आदींना सन्मानित करण्यात आले. माजी प्रभाग संघ अध्यक्ष शामल प्रभू यांचा सत्कार झाला. यावेळी प्रभाग संघातील महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम करीत या मेळाव्यात रंगत आणली. अनन्या हडकर यांनी सूत्रसंचालन केले. सोनाली चव्हाण यांनी आभार मानले.
--
इतर मान्यवरांची मनोगते
बीडीओ चव्हाण म्हणाले, ‘‘नेरुर प्रभागाने विविध उपक्रम राबविले. त्याची दखल जिल्ह्यातील प्रभाग घेत आहेत. विकासात्मक वाटचाल करताना एकजूट महत्त्वाची आहे. ती आज या मेळाव्यातून दिसली.’’ सोनाली चव्हाण यांनी ‘‘सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सर्वांचे योगदान आहे. भविष्यात अशीच साथ द्यावी. यापुढेही विविध उपक्रम राबविण्यात येतील,’’ अशी ग्वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

Pune News: माेठी बातमी! 'संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा'; पुरंदर-हवेली मतदारसंघात खळबळ

Solapur: राष्ट्रवादीच्या दोन जिल्हाध्यक्षपदाचा तिढा सोमवारी सुटणार?; बळिराम साठे ज्येष्ठ नेते शरद पवारांना भेटणार

Tarachand Agarwal CA Final: मानलं बॉस...! ७१व्या वर्षी पास करून दाखवली कठीण 'CA' परीक्षा अन् स्वप्न पूर्ण केलंच

ENG-U19 vs IND-U19: भारतीय कर्णधाराचे इंग्लंडमध्ये दमदार शतक; १४ चौकार अन् २ षटकारांसह इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवले

SCROLL FOR NEXT