कोकण

कामातून उमटले आदर्श पुरस्काराचे मुकुट

CD

.४७ (पान २ साठी)

-ratchl२६.jpg ः
२३M०००५०
चिपळूण ः आदर्श ग्रामसेविका संगीता गावडे यांचा सत्कार करताना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी.
---
कळंबस्तेच्या ग्रामसेविका संगीता गावडेंचा गौरव

चिपळूण, ता. २ ः लोककल्याणासाठी शासनाकडून विविध शासकीय योजना, अभियान राबवले जातात. गावस्तरावरील शासकीय कर्मचारी योजनांच्या अंलबजावणीत कितपत योगदान देतात त्यावर योजनांचे यश अवलंबून असते. कामात झोकून देत काम केल्यास त्याचे चांगले पडसाद नक्कीच उमटतात. कळंबस्ते ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका संगीता गावडे यांनीही गेल्या १७ वर्षात विविध अभियाने आणि योजनांमध्ये जिल्हा तसेच तालुका पातळीवर पारितोषिके मिळवलीत. याचीच दखल आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी घेण्यात आली. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्यांचा नुकताच जिल्हा परिषदेत गौरव करण्यात आला. याबद्दल कळबंस्ते ग्रामपंचायतीत पदाधिकाऱ्यांच्यावतीने ग्रामसेविका गावडे यांचा सन्मान करण्यात आला.
रत्नागिरी येथे आदर्श ग्रामसेवक तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात विजेते ठरलेल्या ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. गावडे या २००६ मध्ये अनारी येथे ग्रामसेविका म्हणून सेवेत रूजू झाल्या. त्यांना सुरवातीपासून शासकीय कामात झोकून देत काम करण्याची सवय. महात्मा गांधी तंटामुक्त योजना, निर्मलग्राम, पर्यावरण संतुलित ग्रामसमृद्धी योजना, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीसह विविध कामे, बचतगटात महिलांचा सक्रिय सहभाग वाढवणे आणि स्मार्ट ग्रामयोजनेत त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या या योगदानातून २०१७-१८ मध्ये वालोपे ग्रापंचायतीस स्मार्ट ग्रामचे तालुकास्तरावरील प्रथम क्रमांकाचे १० लाखाचे बक्षिस मिळाले. त्यांच्याच कालावधीत वालोपेला स्वच्छता अभियानात जिल्हास्तरावर तिसरा क्रमांक मिळाला होता. वालोपे गाव बिमाग्राम होण्यासाठी त्यांनी योगदान दिले होते. सध्या त्या कळबंस्ते व परशुराम येथे कार्यरत आहेत. त्यांच्या या कुशल कामगिरीची दखल घेत आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेने निवड केली होती. या निमित्ताने आदर्श अंगणवाडी सेविका अमृता शिगवण यांचाही सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Paithan News : केकत जळगावमध्ये ग्रामस्थांची सतर्कता कामी आली; महावितरण तार चोरीचा प्रयत्न फसला!

Jalgaon News : थंडीचा कडाका अन् मेथीच्या लाडूंचा तडका! जळगावात घराघरांत दरवळला पारंपरिक स्वाद

IPL 2026 Auction: CSK ने प्रशांत वीरवर १४ कोटी का लावले? २० वर्षीय खेळाडूकडे असं काय आहे खास? वाचाल तर खूश व्हाल

SCROLL FOR NEXT