कोकण

आंबोली, दोडामार्गसह अनेक भागात सरी पुन्हा मोठा बदल

CD

आंबोली, दोडामार्गसह
अनेक भागात सरी
जिल्हाभर ढगाळ वातावरणात
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ८ ः जिल्ह्याच्या वातावरणात बदल झाला असून आज सायंकाळी जिल्ह्यातील आंबोली, दोडामार्गसह काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. या वातावरणाचा धसका आंबा बागायतदारांनी घेतला आहे.
जिल्ह्यात रविवार सायंकाळपासून ढगाळ वातावरण आहे. आज सकाळपासून प्रचंड उष्मा जाणवत होता. दुपारनंतर वातावरणात बदल जाणवण्यास सुरुवात झाली. सायंकाळी संपूर्ण जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले. जिल्ह्यातील आंबोली आणि दोडामार्ग तालुक्यांतील काही गावांमध्ये हलक्या सरी कोसळल्या. जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यात कोणत्याहीक्षणी पाऊस पडेल, अशी स्थिती आहे. संपूर्ण जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाल्याने आंबा बागायतदारांची धास्ती वाढली आहे. जिल्ह्यातील आंबा हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पाऊस झाल्यास आंब्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यातच पूर्वपट्ट्यातील गावांमधील काही आंबा आता काढणीला आला आहे. पावसामुळे या आंब्याचे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे.
कार्यक्रमांवर पावसाचे सावट
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सुरू आहेत. यामध्ये लग्न, पूजा, गोंधळ याशिवाय सार्वजनिक कार्यक्रमांचा देखील समावेश आहे. या कार्यक्रमासाठी मंडप उभारलेले आहेत. पावसाचे वातावरण तयार झाल्यामुळे या लोकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT