कोकण

कृषी पर्यवेक्षक अपघातात ठार

CD

अपघातात जखमी
कृषी पर्यवेक्षकाचा मृत्यूचिपळूण, ता. ११ः चिपळूण गुहागर मार्गावरील कळवंडे फाटा येथे दुचाकी आणि मोटाची धडक झाली. यात मार्गताम्हाणे येथील कृषी पर्यवेक्षक लक्ष्मण ज्ञानू शिंदे (वय ४८) गंभीर जखमी झाले होते. त्यांना प्राथमिक उपचार करून कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. मात्र आज गुरुवारी त्यांचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. लक्ष्मण शिंदे हे १९९७ मध्ये तालुका कृषी कार्यालयात सेवेत रुजू झाले होते. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील होते. सध्या ते मार्गताम्हाणे येथे कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसाने नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी बुधवारी ते मार्गताम्हाणे
परिसरात निघाले होते. दरम्यान सकाळी नऊ वाजता कळवंडे फाटा येथे त्यांच्या दुचाकीस मोटारीने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले होते. कोल्हापूर येथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी,आई, वडील, मुले,मुली असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT