कोकण

खल्वायनची संगित मैफल

CD

८ (टुडे पान १ साठी, संक्षिप्त पट्टा)

खल्वायनची आज संगीत मैफल

रत्नागिरी ः येथील खल्वायन रत्नागिरी या संस्थेची २८९वी मासिक संगीत सभा उद्या (ता. १३) सायंकाळी सात ते नऊ या वेळेत गोदुताई जांभेकर विद्यालयात म्हैसूरच्या श्रीमती देवी यांच्या शास्त्रीय तसेच अभंग गायनाने रंगणार आहे. (कै.) जगन्नाथ यशवंत उर्फ नाना खोत सावंत (नाचणे) स्मृती संगीत मैफल म्हणून होणार आहे. ही मैफल विनामुल्य आहे. संगीतप्रेमी रसिकांनी मैफलीला उपस्थित राहावे, असे आवाहन खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.
-------
सोमवारी महिला लोकशाही दिन

रत्नागिरी ः जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा केला जातो. येत्या १५ मे रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता ज्या महिलांना लोकशाही दिनास प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही अशा महिलांच्या सोयीच्यादृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना प्रायोगिक तत्त्वावर फोनद्वारे संपर्क करून सोमवारी महिला लोकशाही दिनात जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या १०७७ या टोलफ्री क्रमांकावर दुपारी १२ ते १ वा. या वेळेत त्यांचे निवेदन, अर्ज नोंदवता येतील.
--

कळंबणी खुर्दमध्ये २८ ला मोफत नेत्रतपासणी शिबिर

खेड ः कळंबणी खुर्द जलसमिती व इन्फिगो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने २८ मे रोजी कळंबणी खुर्द येथील प्राथमिक शाळेत सकाळी ११ ते सायं. ४ या वेळेत मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रुग्णांची मोफत नेत्रतपासणी करण्यात येणार असून, अठरागाव परिसरातील रुग्णांनी शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT