कोकण

सावंतवाडी पत्रकार संघातर्फे बुधवारी नेत्र चिकित्सा शिबिर

CD

02636
सावंतवाडी ः येथे आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे. शेजारी हरिश्चंद्र पवार, अमोल टेंबकर, मयूर चराटकर, दीपक गावकर, नरेंद्र देशपांडे आदी.

सावंतवाडी पत्रकार संघातर्फे
बुधवारी नेत्र चिकित्सा शिबिर
सावंतवाडी, ता. १३ ः आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त तालुका पत्रकार संघ, नॅब तथा नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड युनिट महाराष्ट्र, नाशिक सिंधुदुर्ग युनिट आणि रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत नेत्र चिकित्सा व चष्मे वाटपाचा कार्यक्रम बुधवारी (ता. १७) सकाळी ९.३० वाजता भटवाडी येथील नॅबच्या नेत्र रुग्णालयामध्ये आयोजित केला आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले आहे.
नेत्र चिकित्सेसाठी सकाळी नऊपासून नाव नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. या शिबिराचे उद्‍घाटन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली नॅब संस्थेचे जिल्हाध्यक्ष अनंत उचगावकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षा डॉ. विनया बाड, श्री दत्तगुरु बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे उदय भोसले, सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा चलवाडी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची बैठक नुकतीच तालुकाध्यक्ष पवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील पत्रकार कक्षामध्ये पार पडली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, सचिव मयूर चराठकर, राजू तावडे, दीपक गावकर, नरेंद्र देशपांडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

Sakal Vidya : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रमाबाबत चिंचवडमध्ये येत्या रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

BG Kolse Patil : ‘पंतप्रधानांना ३०० कोटींचा हिशोब द्यावा लागेल’; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची टीका

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

SCROLL FOR NEXT