कोकण

डॉ. आंबेडकरांचे पणतू येणार आबलोलीत

CD

१९ (टुडे पान ३ साठी)


आनंदवन बुद्ध विहाराचा रौप्य महोत्सव

आजपासून तीन दिवस कार्यक्रम ; डॉ. आंबेडकरांचे पणतू येणार आबलोलीत

गुहागर, ता. १६ ः तालुक्यातील मौजे आबलोली बुद्ध विहाराचा रौप्य महोत्सव वर्धापन दिन १७, १८, १९ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. तथागत् भगवान गौतम बुद्ध यांची २५६७वी जयंती आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती असा संयुक्त महोत्सव सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यानिमित्ताने १८ मे रोजी डॉ. आंबेडकर यांचे पणतू राजरत्न अशोकराव आंबेडकर आबलोलीत येणार आहेत.
आनंदवन बुद्ध विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह विश्वस्त मंडळ आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध विहाराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बुधवारी (ता. १७) मे रोजी सकाळी भन्ते महेंद्रा बोधी (बदलापूर) यांचे आगमन, ९.३० वा. ध्वजारोहण व बुद्धपूजापाठ, सकाळी मान्यवरांचा सत्कार, ११.३० वा. भन्ते महेंद्रा बोधी (बदलापूर) यांची बुद्ध आणि त्यांचा धम्म व सद्यःस्थिती या विषयावर धम्मदेसना, रात्री ८ वा. आनंदवन बुद्ध विहार आबलोली कला विभाग महिला मंडळ यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्यनाटिका कार्यक्रम. १८ ला सकाळी ९.३० ते १० दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धम्मसंघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न अशोकराव आंबेडकर यांचे बुद्ध विहारात आगमन, सकाळी १० ते १०.३० ध्वजारोहण व बुद्ध पूजापाठ, स्वागत समारंभ व मान्यवरांचा सत्कार सोहळा, दुपारी १२ वा. जाहीर सभा विषय- धर्माच्या नावावरून चाललेले राजकारण व अघोषित आणीबाणी यामुळे भारतीय लोकशाही धोक्यात २) भारतीय संविधानास झुगारणार तर देशास मुकणार आणि ३) सद्यःस्थिती या विषयांवर राजरत्न आंबेडकर हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती जिल्हा रत्नागिरी या संस्थेचा अंधश्रद्धा निर्मुलनाचा प्रात्याक्षिकासह प्रबोधनाचा कार्यक्रम होणार असून रात्री नाट्यप्रयोग सादर होणार आहे. १९ ला सकाळी १० वा. ध्वजारोहण व बुद्धपूजापाठ, सकाळी १०.३० ते १२ स्वागत समारंभ व ज्येष्ठ सभासदांचा सत्कार सोहळा, दुपारी जाहीर सभा, रात्री ऑर्केस्ट्रा होईल. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम कदम, सचिव अविनाश कदम, मुंबई संस्थेचे सेक्रेटरी अनिल कदम यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: PM मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT