कोकण

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मालवणात शिवसेनेची मागणी

CD

वीजपुरवठा सुरळीत करण्याची
मालवणात शिवसेनेची मागणी
मालवण, ता. १७ : शहर आणि ग्रामीण भागात कमी दाबाच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे पर्यटन व्यावसायिक, नागरिकांना नाहक त्रास होत असून अनेकांचे आर्थिक नुकसान होत आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी याबाबत महावितरणचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. पावसाळ्यापूर्वी वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी खोबरेकर यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरामध्ये कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे पर्यटन व्यावसायिक, नागरिकांना नाहक त्रास होत आहे. शहर, वायरी, तारकर्ली देवबाग या ठिकाणी पर्यटन वाढत आहे. येथील व्यावसायिकांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या प्रकारे सुविधा देता येत नाहीत. त्यामुळे पर्यटकांतून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त होते. एसी, फॅन, अन्य विजेची उपकरणे जळून खाक होतात. याबाबत तातडीने कार्यवाही करून शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत करावा, अशी मागणी श्री. खोबरेकर यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT