कोकण

चिपळूण-गोवळकोटमधील नवीन रस्त्याचे काम लागणार मार्गी

CD

ratchl241.jpg-
04687
चिपळूणः गोवळकोट येथील शहर विकास आराखड्यातील रस्त्याची पाहणी करताना मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, अनंत मोरे, वैभव निवाते, विनायक सावंत व ग्रामस्थ.
-------------------
गोवळकोटातील रस्त्याचे काम मार्गी
मुख्याधिकाऱ्यांनी केली पाहणी; नागरिकांच्या आशा पल्लवित
चिपळूण, ता. २५ः शहरात मोठी लोकवस्ती असलेल्या गोवळकोट येथील शहर विकास आराखड्यातील नवीन रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. चिपळूण पालिका प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी अधिकारी व नागरिक यांच्यासह या प्रस्तावित रस्त्याची पाहणी केली. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
शहरामध्ये सध्या गाळ काढण्याचे काम जोरात सुरू आहे. या काढलेल्या गाळाचा उपयोग करून चिपळूण पालिका गोवळकोट येथे शहर विकास आराखड्यातील नवीन रस्ता तयार करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अनेक वर्षे रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न यामुळे मार्गी लागणार आहे. याच धर्तीवर मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी या प्रस्तावित रस्त्याला मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. वाशिष्ठी नदीतून काढलेला गाळ टाकण्यास पुरेशा शासकीय जागा शहरात शिल्लक नाहीत. त्यामुळे शहर विकास आराखड्यात ज्या रस्त्यांचा समावेश आहे. अशा रस्त्यांच्या ठिकाणी भरावासाठी गाळाचा वापर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यापूर्वीच दिल्या होत्या. तसेच नदीकाठच्या गाळावर तोडगा निघण्यासाठी काही सुचनाही केल्या होत्या.
दीर्घ कालावधीनंतर गोवळकोट येथील नवीन रस्त्याची हालचाल सुरू झाल्याने ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या वेळी प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते व बांधकाम विभागातील विनायक सावंत तसेच तुषार रेडीज, रामचंद्र भागडे, लक्ष्मण हेलवंडे, समीर चौगुले, हेमंत भैरवकर, अनिल बडदे, ओंकार हेलवंडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT