कोकण

सिंधुदुर्ग एसटी कामगार सेना जिल्हाध्यक्षपदी अनुप नाईक

CD

kan254.jpg
05020
कणकवली : येथील एस.टी. कामगार सेना निवड बैठकीनंतर खासदार विनायक राऊत यांनी एस. टी. कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांना दिले. यावेळी आमदार वैभव नाईक आणि एस.टी. कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
----------
सिंधुदुर्ग एसटी कामगार सेना
जिल्हाध्यक्षपदी अनुप नाईक
सचिवपदी भगवान धुरी यांची निवड
कणकवली, ता. २५ : महाराष्ट्र एसटी कामगार सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी अनुप नाईक यांची तर जिल्हा सचिवपदी भगवान धुरी (आबा धुरी ) यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची बैठक खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, सतीश सावंत आदी उपस्थित होते. या बैठकीत एस.टी.कामगार सेना पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या बैठकीवेळी कणकवली विधानसभा प्रमुख सचिन सावंत, एसटी कामगार सेना जिल्हाअध्यक्ष अनुप नाईक, जिल्हा सचिव भगवान धुरी, युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी, हेमंत राणे, वेंगुर्ला उपतालुकाप्रमुख अजित गावडे, सुमन कामत, मिलिंद दळवी, राम येडके, विनोद कुलकर्णी, विष्णू जोशी, संदीप सावंत, महेश तावडे, अभिजित राणे, अमोल कदम, सुनील चव्हाण, अमोल परब आदी उपस्थित होते.
कामगार सेना पदाधिकारी निवड बैठकीनंतर खासदार विनायक राऊत यांनी एस.टी. विभागाचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्या समवेत बैठक घेतली. या बैठकीत ग्रामीण भागातील एस.टी.बस वेळेत पोचतील याची दक्षात घ्या असे निर्देश श्री. राऊत यांनी दिले. यानंतर एस.टी. कामगार सेनेच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याबाबतचे निवेदन खासदार श्री.राऊत यांनी विभाग नियंत्रकांना दिले.

चौकट
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या
- कुडाळ आगारात आगार व्यवस्थापक म्हणून श्री. पाटील (सहाय्यक यंत्र अभियंता) यांना त्वरित कायमस्वरूपी नेमणूक देण्यात यावी.
- विभागातील वाहतूक पर्यवेक्षकांची नेमणूक आस्थापना पर्यवेक्षक म्हणून देण्यात यावी.
- सावंतवाडी आगारात डिझेल पंपावर तत्काळ शेड उभारण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी.
- मार्ग तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पूर्ववत करण्यात याव्यात.
- चालक वाहक पदातील कर्मचाऱ्यांना लिपिक पदात नेमणूक देताना बालसंगोपन, प्रसूती व वैद्यकीय रजा घेतलेल्या चालक वाहकांना परिपत्रकीय सूचनेनुसार त्वरित लिपिक पदात सामावून घेण्यात यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT