कोकण

चिपळूण ः चौपदरीकरणाविषयी संयुक्त बैठक घ्यावी

CD

ratchl271.jpg
05334
चिपळूणः येथे सुरू असलेले महामार्ग चौपदरीकरणाचे काम.

चिपळुणातील चौपदरीकरणाची कामे अर्धवट
संजय तांबडे ; पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे गरजेचे, संयुक्त बैठक बोलवा
चिपळूण, ता. २७ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे चिपळूण शहरात काम जोमात सुरू आहे; परंतु काही भागात विविध कामे अजूनही अर्धवट स्थितीत आहेत. पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे ही कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लागणे गरजेचे आहे. या कामांचा आढावा घेण्यासाठी अधिकारी, ठेकेदार, लोकप्रतिनिधी व नागरिक यांची संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी माजी नगरसेवक संजय तांबडे यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे केली आहे.
महामार्गावरील अर्धवट कामांकडे माजी नगरसेवक संजय तांबडे यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी आमदार निकम यांना दिलेल्या निवेदनानुसार, चिपळूण शहरामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम कित्येक वर्षे चालले आहे. आता खुपसे काम पूर्णत्वास येत असले तरी कित्येक ठिकाणी ती कामे अर्धवट अवस्थेत आहेत. बहादूरशेखनाका ते पाग विश्रामगृहापर्यंत काही भागात काम अपूर्णावस्थेत शिल्लक आहेत. विशेषकरून पाग पॉवरहाऊस चौक आणि बहादूरशेख चौक या चौकांमधील कामे पावसाळ्याआधी परिपूर्ण होणे गरजेचे आहे. कारण या चौकांमधून चारही बाजूने मोठ्या प्रमाणांवर वाहनांची वर्दळ असते. त्यामध्ये हेवी गाड्यांची वाहतूकदेखील मोठ्या प्रमाणावर आहे. दोन्ही चौकांमधील कामे अर्धवट अवस्थेत आहेत. चौकांमध्ये स्ट्रीटलाईट, हायमास्ट नसल्याने रात्रीच्यावेळी नागरिकांनी प्रवास करणे जीवघेणे झाले आहे. त्या संदर्भात कंपनीकडे वारंवार तक्रार करून नागरिकांच्या आणि वाहतुकीच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. याचा आढावा घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, ठेकेदार कंपनी अधिकारी, चिपळूण नगर पालिका अधिकारी यांच्या समवेत मीटिंग घेऊन ही सर्व कामे पावसाळ्याआधी पूर्ण करण्याचे आदेश आपण द्यावेत. या आढावा बैठकीला लोकप्रतिनिधी, समाजसेवक, शहरातील नागरिकांना आमंत्रित करावे, अशी मागणीही संजय तांबडे यांनी केली आहे.

-------
चौकट
ही कामे होणे गरजेचे
पाग पॉवरहाऊस चौकामधील प्रवासीशेडची व्यवस्था न केल्याने नागरिक भरउन्हात रस्त्याच्या मध्ये उभे असतात. चारही बाजूने वाहनांची वर्दळ चालू असते. तरी तातडीने प्रवासी शेडची व्यवस्था होणे गरजेचे आहे. रस्त्याच्या बाजूने ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, दोन्ही बाजूचे सर्व्हिस रस्ते अशा अनेक कामांचा आढावा घेणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT