कोकण

‘आरोग्यवर्धिनी’ स्थानिकांच्या हितासाठी

CD

05379
सावंतवाडी ः मिलाग्रीस हायस्कूल समोरील जुन्या मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानात सुरू असलेले आरोग्यवर्धिनीचे काम.

‘आरोग्यवर्धिनी’ स्थानिकांच्या हितासाठी

सावंतवाडी पालिकेचे स्पष्टीकरण; विरोध न करण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः शहरासाठी शासनाकडून दोन आरोग्यवर्धिनी केंद्र मंजूर करण्यात आली आहेत. त्यातील एक केंद्र मिलाग्रीस हायस्कूल समोरील जुन्या मुख्याधिकारी निवासस्थानात सुरू केले जाणार आहे. दुसरे केंद्र लाखे वस्तीतील बंद इमारतीत सुरू करायचे होते; परंतु त्या ठिकाणी स्थानिक रहिवाशांकडून विरोध होत असल्याने ते रखडण्याची शक्यता आहे. याबाबत पालिकेचे अधिकारी शिवप्रसाद कुडपकर यांच्याकडून दुजोरा देण्यात आला आहे. स्थानिकांच्या फायद्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या धर्तीवर हे केंद्र होणार आहे. त्यामुळे त्याला विरोध करू नये, असे आवाहन त्यांनी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून केले आहे.
शासनाच्या माध्यमातून सावंतवाडीसाठी दोन आरोग्यवर्धिनी केंद्र मंजूर करण्यात आली आहेत. त्यातील एक केंद्र सालईवाडा मिलाग्रीस हायस्कूलच्या समोर असलेल्या मुख्याधिकाऱ्यांच्या जुन्या निवासस्थानात उभारले जात आहे. या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी जोरदार काम सुरू आहे. त्यामुळे गेली पंधरा ते वीस वर्षे बंद असलेली ही इमारत पुन्हा एकदा गजबजणार आहे. दुसरी जागा ही लाखे वस्तीत बंद असलेल्या अंगणवाडीच्या इमारतीत सुरू करण्यात येणार होते; परंतु या केंद्रास स्थानिक लाखे बांधवांनी विरोध केला आहे. ती जागा आम्ही अन्य कारणांसाठी वापरतो, त्यामुळे आरोग्य केंद्र आपल्याकडे नको, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दुसरे केंद्र सुरू होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.
---
कुडपकर यांच्या मते...
याबाबत पालिका प्रशासनाचे बांधकाम अधिकारी कुडपकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतची माहिती दिली. कुडपकर यांच्या म्हणण्यानुसार, शासनाच्या माध्यमातून शहरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या धर्तीवर हे दोन दवाखाने मंजूर करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी एक डॉक्टर, नर्स आणि कपांउडर असे तीन कर्मचारी चोवीस तास सेवा देणार आहेत. त्यामुळे त्याचा फायदा लोकांना होणार आहे. लवकरच या दोन्ही दवाखान्यांचे उद्घाटन करण्यात येणार आहे; मात्र त्यासाठी लाखे वस्तीतील बांधवांनी सकारात्मक पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT