कोकण

सकाळ नाट्य महोत्सव कऱ्हाडसाठी

CD

कऱ्हाडसाठी

पडदा, पोस्टर फोटो आजच्या बातमीतून घेणे
..............
नाटकांच्या तिकीट खरेदीला रसिकांचा भरघोस प्रतिसाद

सकाळ नाट्यमहोत्सव; वैविध्यपुर्ण नाटकांबाबत रसिकांमध्ये उत्सुकता

सकाळ वृत्तसेवा
कऱ्हाड, ता. २ : वैविध्यपूर्ण आणि आशयघन नाटकांची मेजवानी देणाऱ्या ‘सकाळ नाट्य महोत्सवा’ला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. नेहमीच्या दरांपेक्षा सवलतीत या नाटकांचा आनंद घेण्याची संधी असल्याने दैनंदिन तिकिटांना आणि संपूर्ण महोत्सवाच्या तिकिटांनाही रसिकांची मोठी मागणी आहे. दर्जेदार नाटके असलेला ‘सकाळ नाट्य महोत्सव’ सहा ते आठ जूनदरम्यान रंगणार आहे. यशवंतराव स्मृती सदन येथे दररोज रात्री साडेनऊ वाजता महोत्सव होणार आहे.
वैविध्यपूर्ण विषयांवरील तीन दर्जेदार नाटके या महोत्सवात रसिकांना पाहता येणार आहेत. महोत्सवाचे मुख्य प्रायोजक चितळे डेअरी आणि सहयोगी प्रायोजक तनिष्क ज्वेलर्स व यशवंत को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड (फलटण), दि शिवसमर्थ मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (तळमावले, सातारा) हे आहेत.
दरम्यान, प्रशांत दामले, भरत जाधव, संकर्षण कऱ्हाडे यांच्यासह मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील सेलिब्रिटींचा नाट्याविष्कार यानिमित्ताने सजणार आहे. त्याशिवाय त्यांच्याशी संवादही साधता येणार आहे. सध्याच्या व्यावसायिक रंगभूमीवर सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या नाटकांचा महोत्सवात समावेश आहे. साहजिकच, ही एक वेगळी पर्वणी कोल्हापूरकरांना अनुभवता येणार आहे.

चौकट
महोत्सवाचे तपशील असे
कधी : ६ ते ८ जून
केव्हा : दररोज रात्री ९.३० वाजता
कुठे : यशवंतराव स्मृती सदन, कऱ्हाड
----
चौकट
महोत्सवाचे वेळापत्रक
मंगळवार (ता. ६) : ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’
बुधवार (ता. ७) : ‘नियम व अटी लागू’
गुरुवार (ता. ८ ) : ‘तू तू मी मी’
..........
चौकट
तिकिटांचे दर (प्रति व्यक्ती रुपये)
संपूर्ण महोत्सवाचे तिकीट (तळमजला) : १२००
प्रतिनाटक तिकीट (तळमजला) : ५००
प्रतिनाटक तिकीट (बाल्कनी) : ४००

चौकट
असे बुकिंग करा तिकीट
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची दैनंदिन तिकिटे उपलब्ध आहेत. दैनंदिन तिकिटे ‘बुक माय शो’च्या संकेतस्थळासह फोन बुकिंगवर उपलब्ध आहेत. ९४२२४०५००७ या क्रमांकावर संपर्क साधूनही तिकिटे आरक्षित करता येतील. त्याशिवाय यशवंतराव स्मृती सदन (सकाळी नऊ ते बारा, सायंकाळी चार ते नऊ), चितळे एक्स्प्रेस (त्रिगुण एम्पायर, मंगळवार पेठ) (सकाळी अकरा ते सायंकाळी सात) येथेही तिकिटे उपलब्ध होणार आहेत.
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT