कोकण

शालेय स्पर्धा परीक्षा ठरल्या यशाची पायरी

CD

07261
नांदोस ः युपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्या तुषार पवार यांचा सत्कार करताना किशोर शिरोडकर. शेजारी दीपक भोगटे, शाम पावसकर, वैष्णवी लाड आदी.

शालेय स्पर्धा परीक्षा ठरल्या यशाची पायरी

तुषार पवार; बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्यावतीने नांदोस येथे सत्कार

ओरोस, ता. ५ ः अविनाश धर्माधिकारी यांचे सिंधुदुर्गनगरी येथे झालेले व्याख्यान ऐकून मीही ही परीक्षा द्यावी, असा विचार माझ्या मनात आला. शालेय स्तरावरील पाचवी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा, एनएम, एमएस या परीक्षांचा खूपच फायदा झाला. ही स्पर्धा परीक्षेची पायरी आहे. सर्व मुलांनी या परीक्षा देणे आवश्यक आहे, असे मत युपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्या तुषार पवार यांनी व्यक्त केले. बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्यावतीने यूपीएससी परीक्षेत धवल यश मिळवल्याबद्दल पवार यांचा नांदोस (ता.मालवण) येथे त्याच्या मूळ गावी सत्कार करण्यात आला.
यावेळी किशोर शिरोडकर, शाम पावसकर, दीपक भोगटे, वैष्णवी लाड, प्रशांत म्हाडगुत, सुजाता पावसकर, श्रीधर गोंधळी, तुषारचे आई, वडिल, आजी, आजोबा, अमित चव्हाण व त्याचे कुटुंबिय उपस्थित होते. तुषार यांच्या अत्यंत सोज्वळ व्यक्तिमत्वामुळे सेवांगणचे उपस्थित पदाधिकारी प्रथमदर्शनीच प्रभावीत झाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या अनौपचारिक गप्पा झाल्या. यावेळी त्यांनी यशाचे गणित कसे सोडवले? याचा उलघडा केला. ते म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गनगरी येथे धर्माधिकारी यांचे एक व्याख्यान झाले होते. ते ऐकून मीही परीक्षा द्यावी, असा विचार माझ्या मनात आला. मात्र, यासाठी शालेय स्तरावरील पाचवी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा, एनएम, एमएस या परीक्षांचा केलेल्या अभ्यासाचा खूपच फायदा झाला. या स्पर्धा युपीएससी परीक्षेची पायरी आहे. त्यामुळे सर्व मुलांनी त्या देणे आवश्यक आहे. युपीएससीची तयारी करताना खासगी क्लास काही महिने जॉईन केला होता; मात्र, त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे आपण पूर्ण अभ्यास यू ट्यूब व पुस्तकाच्या माध्यमातून केला. रोज सात ते आठ तास आपण अभ्यास करीत होतो. यासाठी आपला नंबर ८०० पेक्षा जास्त असून आपल्याला यापेक्षा जास्त गुणवत्ता मिळवून प्रशासकीय सेवेत यायचं आहे, हे ठासून ठरवीत पुन्हा परीक्षेला बसलो होतो.’’
---------
चौकट
बॅ. नाथ पै, दंडवते आदर्श
तुषार यांना सेवांगण यांच्यावतीने देण्यात आलेल्या अभिनंदन पत्रात प्रा. मधु दंडवते व बॅ. नाथ पै यांचे नाव व छायाचित्रे आहेत. ते पाहून ते खूप आनंदीत झाले. या दोन महनीय, आदरणीय व्यक्तींचा अभ्यास केल्याशिवाय सिंधुदुर्गची खरी प्रतिमा दिसणार नाही. तसेच अभ्यास पूर्ण होणार नाही. ते माझे आदर्श आहेत, असे उद्गार त्यांनी काढले.
-----------
चौकट
कार्यशाळा घेणार
तुषार यांच्याशी गप्पा करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. त्यांना आपल्या जिल्ह्यातील मुलांसाठी काहीतरी करायचे आहे. ऑक्टोबरमध्ये सेवांगण मालवण व सेवांगण कट्टा येथे विद्यार्थ्यासाठी पूर्ण दिवसाची कार्यशाळा घेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला, असे दीपक भोगटे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT