कोकण

मुस्लिम ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी नेवरेकर

CD

rat६p३३.jpg ः
०७६५२
रत्नागिरीः लांजा येथील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड महाराष्ट्र, कोकण विभागाचे प्रदेशाध्यक्ष मुज्जफर सय्यद यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारताना यासिन नेवरेकर.
----
मुस्लिम ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी नेवरेकर
रत्नागिरीः लांजा येथील सामाजिक कार्यकर्ते यासिन अब्दुल हमीद नेवरकर यांची छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. मराठा सेवा संघ व छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड तालुका शाखा लांजातर्फे शिवस्वराज्य राज्यभिषेक दिन सोहळा वाघधरे पटांगणावर झाला. त्या वेळी नेवरेकर यांचा सत्कार व नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड महाराष्ट्र, कोकण विभागाचे प्रदेशाध्यक्ष व शिवव्याख्याते शिवश्री मुज्जफर सय्यद, तहसीलदार प्रमोद कदम, पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, उद्योजक शिवाजी कोत्रे, महमदशेठ रखांगी, जमातुल मुस्लिमिन आदी उपस्थित होते.
-----------
किसान सन्मान निधीसाठी ई-केवायसी
पावसः प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभासाठी ई-केवायसी करण्यात यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वर्षाला सहा हजार रुपये इतका लाभ दिला जातो. आता योजनेचा १४वा लाभाचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे; परंतु त्यासाठी लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे तरी त्याची मोहीम १९ ते १५ मे या कालावधीत राबवण्यात आली असून ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली नाही अशा लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया तत्काळ करण्याची कार्यवाही करावी. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरमधून PM KISAN GOI हे FACE recognition अॅप डाऊनलोड करून घ्यावे लागते. त्याद्वारे ई-केवायसी करावी लागेल. एका पीएम किसान अॅप लाभार्थ्यास दहा लाभार्थ्यांची ई-केवायसी करता येईल. ही ई-केवायसी मोहीम गावपातळीवर मोहीम स्वरूपात राबवण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना ई-केवायसीबाबत अडचण येत आहे अशा शेतकऱ्यांनी क्षेत्रीय पातळीवर कृषी सहाय्यक, कृषी पर्यवक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.
-------------------
rat६p३४.jpg
07553
रत्नागिरीः येथे बॉडीबिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स असोसिएशन स्थापनेच्यावेळी उपस्थित मान्यवर.
------
बॉडीबिल्डिंग अँड फिजिक
स्पोर्ट्स असोसिएशन स्थापना
रत्नागिरी ः येथील बॉडीबिल्डर हे वजनी गटातील स्पर्धा खेळून करिअर घडवू शकतात, या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा जीम व्यावसायिक संघटनेतील सगळ्या तालुक्यातील पदाधिकारी यांनी मिळून ''बॉडीबिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स असोसिएशन'' स्थापन केली आहे. असोसिएशनची नोंदणी होताच त्यांची पहिली सर्वसाधारण सभा चिपळूण येथे नुकतीच झाली. या सभेत महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे सेक्रेटरी राजेश चव्हाण आणि इतर पदाधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. चव्हाण यांनी बॉडीबिल्डिंग अॅण्ड फिजिक स्पोटर्स असोसिएशन रत्नागिरी डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशन (आयबीबीएफ) या संघटनेशी संलग्न करून प्रमाणपत्र प्रदान केले. रत्नागिरी संघटनेचे अध्यक्ष संदीप (बावा) नाचणकर, सेक्रेटरी वैभव कांबळे अणि सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. संघटनेचे उपाध्यक्ष इरफान कादरी यांनी चव्हाण यांचा सत्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Woman Army Officer : कोल्हापूरची ताराराणी दुश्मनाला करणार नेस्तनाबूत! २३ वर्षीय सई जाधवची IMA मध्ये ऐतिहासिक निवड, १६ पुरुषांमधून निवड

Devendra Fadanvis Statement : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलं, खात्यांचा पदभार सोपवला

IND U19 vs SL U19 SF Live: भारत-श्रीलंका सामना रद्द झाल्यास कोण जाईल फायनलला? बांगलादेशकडून पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम

Latest Marathi News Live Update : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात

Epstein Files Explained : मोदी सरकार कोसळणार? एपस्टीन फाइल्स काय आहे, भारतातील नेते का घाबरले? संपूर्ण माहिती एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT