कोकण

मारहाणप्रकरणी संशयिताचा जामीन न्यायालयाने फेटाळला

CD

मारहाणप्रकरणी संशयिताचा
जामीन न्यायालयाने फेटाळला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ः साखरपा-कोंडगाव (ता. संगमेश्वर) येथे कबड्डी स्पर्धा दरम्यान झालेल्या वादातून तरुणाला मारहाण झाली होती. या प्रकरणातील संशयिताचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
सुशांत संजय सुर्वे (वय २६, रा. सुर्वेवाडी, साखरपा) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना १६ एप्रिलला साखरपा कोंडगाव तिठा येथे कबड्डी स्पर्धा दरम्यान झाली होती. गुन्ह्यातील माहितीनुसार साखरपा कोंडगाव तिठा येथे १६ एप्रिल २०२३ ला कबड्डी स्पर्धेदरम्यान वाद उफाळून आला होता. यावेळी संजय सुर्वे, सुशांत सुर्वे व पम्या लोध यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. याचा राग मनात ठेऊन १८ एप्रिल २०२३ सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोंडगाव येथे सुशांत सुर्वे याने तरुणाला मारहाण केली. अशी तक्रार देवरूख पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. २१ एप्रिल २०२३ ला संशयित सुर्वे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती. दरम्यान, जामिन मिळावा यासाठी संशयित सुशांत सुर्वे यांच्याकडून न्यायालयापुढे जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. दोन्ही बाजुच्या युक्तीवादानंतर सत्र न्यायालयाने सुर्वे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोनं 19 हजार तर चांदी 98 हजारांनी स्वस्त! पाहा तुमच्या शहरातील आजचा भाव

Pakistan Cricket : पाकिस्तानचा गोंधळ! T20 World Cup बद्दल केलेला मेसेज डिलिट... आता यांचा काय नवीन ड्रामा? चाहते संतापले

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेची पडताळणी अडचणीत; अंगणवाडी सेविकांचा कामाला नकार

Sanjay Raut statement : सुनेत्रा पवार यांच्या शपविधीवर संजय राऊत म्हणाले, 'शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य योग्यच'

Budget 2026 : 1973 सालच्या बजेटला 'ब्लॅक बजेट' का म्हटलं जात? देशावर नेमकं काय संकट आलं होतं?

SCROLL FOR NEXT