कोकण

जिल्ह्यात शिवराज्याभिषेक उत्साहात

CD

जिल्ह्यात शिवराज्याभिषेक उत्साहात
रत्नागिरीः छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जिल्ह्यात सर्वत्र साजरा करण्यात आला. राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीत ध्वज उभारून महाराजांना रयतेच्यावतीने मानवंदना देण्यात आली. या निमित्त रत्नागिरीत विविध कार्यक्रमही आयोजित केले होते. तारखेप्रमाणे राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी रायगडवरही शिवप्रेमींनी गर्दी केली होती. राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये राज्याभिषेक दिन साजरा झाला. ग्रामविकास मंत्रालयाकडून या बाबत सर्व ग्रामपंचायतींना पत्र पाठवून शिवस्वराज्य दिन साजरा करण्याबाबत माहिती दिली होती. हा ध्वज उभारून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत सादर करण्यात आले. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उत्साह दिसून आला.
-------
rat7p10.jpg
M07776
लांजाः लालपरीला सजवून वाढदिवस साजरा करताना आमदार राजन साळवी, लांजा आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर, लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत व अन्य.

लांजा एसटीचा अमृत महोत्सवी वर्धापनदिन
लांजाः एसटीचा अमृत महोत्सवी वर्धापनदिन लांजा एसटी स्थानकात केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. लालपरीला सजवून तिचा वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमाला आमदार डॉ. राजन साळवी, लांजा आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर, लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत, स्थानकप्रमुख रवींद्र खानविलकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर उपस्थित होते. एसटी कर्मचाऱ्यांनी लालपरीला आकर्षक फुलांनी सजवले होती. प्रवासी यांचे नव्या रूपातील रूपडे एसटी आज लक्ष वेधून घेत होती.
---------
rat7p11.jpg
M07777
मंडणगडः अध्यक्षपदी निवड झाल्याने चंद्रकांत रेवाळे यांचे अभिनंदन करताना माजी अध्यक्ष हरिश्चंद्र निमदे, अनंत लाखण, निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. क्षीरसागर दिनेश सापटे व अन्य.

कुणबी पतसंस्था अध्यक्षपदी चंद्रकांत रेवाळे
मंडणगडः (कै.) सावित्रीबाई भागोजी निमदे कुणबी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेच्या अध्यक्षपदी मंडणगड शहरातील उद्योजक चंद्रकांत रेवाळे यांची तर उपाध्यक्षपदी दिनेश सापटे बिनविरोध निवड झाली. या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक मे महिन्यात पार पडली व जनसेवा पॅनेल विजयी झाले होते. ६ जूनला निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नवनिर्वाचित संचालकांच्या उपस्थितीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. संस्थेच्या अध्यक्षपदासाठी संस्थेचे मावळते अध्यक्ष हरिश्चंद्र निमदे यांनी चंद्रकांत रेवाळे यांचे नाव सूचित केले. त्यास दिनेश सापटे यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्षपदासाठी दिनेश सापटे यांचे नावे संचालक विजय खैरे यांनी सूचित केले. त्यास अनंत लाखण यांनी अनुमोदन दिले.
--------------
rat7p9.Jpg
M07741
सावर्डेः आमदार शेखर निकम व विनोद म्हस्के यांचे निवळी गावातील सुर्वे बंधूंकडून आभार व्यक्त करताना.

भैरी मंदिर सभामंडपासाठी १० लाख
सावर्डे ः सह्याद्रीचा मुकुटमणी असलेल्या प्रचित गडावर असलेल्या भैरी भवानीमातेचे मंदिर आहे. त्यावर अनेकदा पत्रे टाकण्यात आले होते; परंतु येथे असणाऱ्या प्रचंड वाऱ्यामुळे मंदिरावरील पत्रे उडून गेले होते. छप्पर नसल्यामुळे मूर्ती उघड्यावर होत्या. गतवर्षी शिडीचे काम चालू असताना आमदार शेखर निकम यांनी विनोद म्हस्के यांच्याबरोबर अनिरूद्ध निकम यांना पाहणी करायला पाठवले होते. त्या वेळची तिथली दुरावस्था आमदार निकम यांना सांगितली. आमदार निकम यांनी निधीची तरतूद करण्याचे आश्‍वासन विनोद म्हस्के यांना दिले. त्यानंतर सभामंडपासाठी १० लाख रुपयाचा निधी मंजूर केला. याबाबत निवळी गावातील सुर्वे बंधू यांनी आमदार शेखर निकम व शिवप्रेमी विनोद म्हस्के यांचे आभार मानले. या वेळी राजेश सुर्वे, बाबू सुर्वे, गौरव सुर्वे, प्रफुल्ल सुर्वे, अमित सुर्वे, गणेश सुर्वे आदी उपस्थित होते.
--------
Rat7p12.jpg ः
07778
मंडणगडः वृक्षारोपण करताना प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक साळुंखे इतर मान्यवर.

मुंडे महाविद्यालयात पर्यावरण दिन
मंडणगडः सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते गोपीनाथ मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना व वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक साळुंखे, प्रा. शरिफ काझी, डॉ. संगीता घाडगे, ग्रंथपाल दगडू जगताप आदी उपस्थित होते. प्रा. शरिफ काझी यांनी स्वागत केले. या प्रसंगी डॉ. साळुंखे म्हणाले, आज पर्यावरणविषयक जनजागृती करण्यासाठी चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे. खरेतर, वृक्षारोपणाबरोबच वृक्षसंवर्धन ही आज काळाची गरज बनली आहे. महाविद्यालयीन युवकांनी परिसरात निदान एकतरी झाड लावून पर्यावरणाचे रक्षण करावे. या राष्ट्रीय कार्याची सुरवात स्वतःपासून करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आभार डॉ. संगीता घाडगे यांनी मानले.
-------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT