कोकण

रत्नागिरी- रत्नागिरीमध्ये उज्ज्वला भिडे स्मृती बुद्धिबळ स्पर्धा

CD

पान २ साठी

रत्नागिरीमध्ये शनिवारपासून
भिडे स्मृती बुद्धिबळ स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः येथे येत्या शनिवारी (ता. १०) आणि रविवारी (ता. ११) जूनला तालुकास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत होणारी ही पहिलीच स्पर्धा आहे. उज्ज्वला वसंत भिडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रत्नागिरी येथील मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमीतर्फे ही स्पर्धा आयोजित केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्लासिकल बुद्धिबळाच्या नियमांनुसार, स्वीस लीग पद्धतीने ही स्पर्धा घेण्यात येईल. स्पर्धेला रोख रक्कम व इतर उत्तेजनार्थ परितोषिके स्वरूपात खुल्या व विविध गटांमध्ये एकूण १५ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. रत्नागिरी तालुक्यातील बुद्धिबळपटूंना क्लासिकल प्रकारात बुद्धिबळ खेळण्याची ही चांगली संधी आहे. तालुक्यातील प्रथम नाव नोंदवणाऱ्या ३२ खेळाडूंना स्पर्धेत सहभाग घेता येईल. स्पर्धेत नाव नोंदवण्यासाठी चैतन्य भिडे, मंगेश मोडक, विवेक सोहनी यांच्याशी संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील मतदार 'विनाश'ला नव्हे तर 'विकास'ला मत देण्याइतपत हुशार आहेत; राऊतांना भाजप नेत्याचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT